योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र मराठी फॉर्म pdf डाउनलोड करा lek ladki yojana form pdf download

lek ladki yojana form pdf download : नमस्कार, महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये लेक लाडकी योजना ही सुरू केलेली आहे. ही योजना मुख्यत्वे मुलींसाठी आहे. ज्या पाल्यांना आपल्या मुलीचा ‘ लेक लाडकी योजना ‘ यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्यासाठी या पोस्टमध्ये तुम्हाला मोफत लेक लाडकी योजनेचा pdf फॉर्म दिलेला आहे. फॉर्म डाऊनलोड करून तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून तो जमा करायचा आहे. चला तर लेक लाडकी योजना महाराष्ट्र या संदर्भात आपण माहिती पाहू.

lek ladki yojana form pdf download : लेक लाडकी योजना ही मुलींसाठी खास योजना मानली जात आहे. या योजनेमध्ये विविध टप्प्यावर त्यांच्या लेक लाडकी योजना खात्यावर पैसे सरकार टाकणार आहे. यामुळे पालकांना मुलीच्या शिक्षणासंदर्भात तसेच लग्न संदर्भात कोणतीही चिंता राहणार नाही. मुळात ही घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी बजेट 2023 च्या भाषणांमध्ये उल्लेखित केला आहे. भाषणांमध्ये या योजनेचा उल्लेख करताना जे आर्थिक गरीब कुटुंब आहेत त्या पाल्यांना या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे.

महाराष्ट्र मध्ये बहुतांश कुटुंब असे आहेत की जे मुलीचे शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च एकाच वेळी करू शकत नाही. ही बाब लक्षात घेता एकनाथ शिंदे सरकारने या योजनेचा प्रस्ताव बजेट 2023 मध्ये मांडला होता. त्यानुसार मुलीच्या शिक्षणासोबत 5 टप्प्यांमध्ये, 18 वर्षापर्यंत मुलीच्या योजनेच्या खात्यावर सरकार पैसे टाकणार आहे. 18 वर्षे झाले की त्या पाल्याला हे पैसे काढता येणार आहे. एकूण 5 टप्प्यामध्ये सरकारने टाकलेली एकूण रक्कम ही 98 हजार होणार आहे यातून व्याजासकट ही रक्कम एक लाखापेक्षाही सुद्धा जास्त होते. . कोणत्या 5 टप्प्यांमध्ये ही रक्कम सरकार मोफत टाकली जाणारे या संदर्भात आपण थोडी माहिती पाहू.

  • पहिला टप्पा : मुलीचा जन्म झाल्यानंतर. ( 5,000 रुपये सरकार टाकेल )
  • दुसरा टप्पा : जेव्हा मुलगी ही इयत्ता पहिली ला जाईल. (6,000 रुपये सरकार टाकेल )
  • तिसरा टप्पा : जेव्हा मुलगी ही इयत्ता सहावी मध्ये जाईल. ( 7,000 रुपये सरकार टाकेल )
  • चौथा टप्पा : जेव्हा मुलगी ही अकरावी च्या वर्गामध्ये जाईल. ( 8,000 रुपये सरकार टाकेल )
  • पाचवा टप्पा : जेव्हा मुलीचे वय हे 18 वर्ष पूर्ण होईल. ( 75,000 रुपये सरकार टाकेल )

लेक लाडकी योजना महाराष्ट्र फॉर्म PDF डाउनलोड करा Lek Ladki Yojana Maharashtra Pdf form Dawnload

लेक लाडकी योजना महाराष्ट्र या योजनेचा फॉर्म खाली दिलेला आहे. लेक लाडकी योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी खाली दिलेल्या फॉर्म डाऊनलोड करा आणि भरून तो जमा करा.

⬇️ फॉर्म डाऊनलोड करा येथे क्लिक करा

लेक लाडकी योजना महाराष्ट्र योजनेचा उद्देश Lek Ladki Yojana Maharashtra Pdf form Dawnload

लेक लाडकी योजना ही मुलींसाठी खास योजना असणार आहे. या लेक लाडकी योजना मधून जे गरीब कुटुंब आहे त्यांना आर्थिक हातभार भेटणार आहे. मुलीचे शिक्षणालाही हातभार भेटणार आहे तसेच तिच्या लग्नासाठी सुद्धा शासनाकडून हातभार भेटणार आहे.

लेक लाडकी योजनेमुळे समाजाचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो यातून कमी होण्याची शक्यता आहे. तसेच स्री भृण हत्या सारखे होणारे प्रकार यातून संपणार आहेत. मुलींना समाजामध्ये या योजनेमुळे सामाजिक व आर्थिक हातभार मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक पाठबळ नसल्यामुळे शिक्षण घेता येत नव्हते. शासनाने उच्च शिक्षण घेण्यासाठी या योजनेतून प्रोत्साहन केले आहे. तसेच नुकतेच महाराष्ट्र शासनाने मुलींना 200 – 300 प्रकारचे शिक्षण पूर्ण मोफत केले.

लेक लाडकी योजनेचा प्रमुख उद्देश मुलींना आत्मनिर्भर बनवणे हे आहे.

लेक लाडकी योजनेचा प्रमुख उद्देश आहे की, मुली ह्या उच्च शिक्षण घेत नव्हत्या त्यांना ही आधाराची योजना आहे. तसेच मुलींचे शिक्षणात गळतीचे प्रमाण करणे हे सुद्धा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

मुलींना शैक्षणिक दृष्ट्या प्रोत्साहित करणे तसेच त्यांचा जन्मदर वाढवणे हा सुद्धा उद्देश या लेक लाडकी योजनेचा आहे.

lek ladki yojana form pdf download

लेक लाडकी योजना महत्त्वाची माहिती Lek Ladki Yojana Maharashtra

योजना लेक लाडकी योजना
सुरू बजेट 2023 समाविष्ट, 2023 पासून सुरू
लाभार्थी लहान मुली ( गरीब कुटुंबातील मुली )
योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र शासनाने
योजनेचे उद्देश ज्या मुली एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या आहेत, त्या मुलींना जन्म झाल्यापासून ते 18 वर्षे होईपर्यंत 5 टप्प्यांमध्ये एक लाख रुपयापेक्षा जास्त अनुदान भेटले जाणार आहे. याचा वापर ते शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी करू शकतात.
अर्ज कसा करणार हा अर्ज ऑफलाईन आहे, अंगणवाडी सेविके मार्फत हे अर्ज भरले जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट अद्याप घोषित नाही.

लेक लाडकी योजना लाभ कसा मिळणार Lek Ladki Yojana Maharashtra

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक मुलींसाठी महत्वकांशी योजना आहे. महाराष्ट्रमध्ये ज्या मुलींनी 01 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतला आहे किंवा एक एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या सर्व मुली या योजनेसाठी पात्र आहे. या योजनेमध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये त्यांच्या लेक लाडकी योजना खात्यावर सरकारमार्फत अनुदान जमा केले जाणार आहे.

लेक लाडकी योजना अनुदान कसे मिळवणार : लेक लाडकी योजना अनुदान मिळवण्यासाठी ज्या पालकांच्या मुलीने हा जन्म 01 एप्रिल 2023 नंतर घेतलेला आहे. तेच या योजनेमध्ये फॉर्म भरू शकतात.

ज्या पालकांना हा फॉर्म भरायचा आहे , त्यांनी सुरुवातीला हा फॉर्म डाउनलोड करून घ्यावा. याची लिंक वर दिलेली आहे. किंवा तुमच्या गावातील तुझ्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे हा फॉर्म तुम्हाला मिळेल. त्यांच्याकडून हा फॉर्म घेतल्यानंतर त्याची झेरॉक्स काढून घ्या आणि त्याच्यात जेवढे कागदपत्र सांगितले आहेत ते सर्व त्याला जोडा आणि तो फॉर्म अंगणवाडी सेविकीकडे जमा करा.

अंगणवाडी सेविका हा फॉर्म व्यवस्थित चेक करून तसेच कागदपत्रे सर्व आहेत की नाही हे पाहून तो फॉर्म ती त्यांच्या सिनियर कडे जमा करतील. त्यांचे असणारे सीनियर्स तो फॉर्म तालुक्याच्या महिला व बालविकास विभाग कडे जमा करतील. त्यानंतर काही दिवसातच तुम्हाला लेक लाडकी योजनेचे खाते काढून मिळेल. आणि या खात्यावर या पाच टप्प्यांमध्ये पैसे जमा होतील.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे Lek Ladki Yojana Required Document

  1. मुलीचे आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला
  2. मुलीच्या आई-वडिलांपैकी एकाचे आधार कार्ड
  3. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  4. पालकाचा तसेच मुलीचा फोटो
  5. उत्पन्नाचा दाखला
  6. आई-वडिलांसोबत मुलीचा फोटो
  7. मोबाईल नंबर
  8. ईमेल आयडी
  9. बँक पासबुक

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 पात्रता Eligibility Criteria

  1. अर्ज करणार व्यक्ती महाराष्ट्राचीच पाहिजे
  2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे.
  3. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक हेच या योजना पात्र असतील. ( गरीब कुटुंबासाठी ही योजना आहे )
  4. लेक लाडकी योजनेसाठी ज्या मुलीचा अर्ज करणार आहे ती मुलगी 01 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली असावी.
  5. महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील मुलींसाठी ही योजना नाही.

FAQs लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 Lek Ladki Yojana

1. लेक लाडकी योजना ही योजना कोणत्या राज्य सरकारने काढलेली आहे ?

लेक लाडकी योजना ही योजना फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेली आहे. ही योजना एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे

2. लेक लाडकी योजना फॉर्म pdf ?

लेक लाडकी योजना या योजनेस अर्ज करण्यासाठी ऑफलाइन मध्ये फॉर्म आहे. फॉर्म ची लिंक वर दिलेली आहे ( Pdf Dawnload )

3. लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा ?

लेक लाडकी योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला वर दिलेली pdf Dawnload करायचे आहे. डाऊनलोड केल्यानंतर हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रे घेऊन तो तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे. यामध्ये विविध माहिती आहे, जसं की तुमचा मोबाईल नंबर तुमचा पत्ता, एकूण किती अपत्य आहेत तसेच बँकेचा तपशील सुद्धा यामध्ये भरायचा आहे.

4. लेक लाडकी योजना कागदपत्रे ?

लेक लाडकी योजना यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता आहे. यामध्ये मुलीचे आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला, पालकांचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी.

5. लेक लाडकी योजना फॉर्म मराठी ?

लेक लाडकी योजना फॉर्म तुम्हाला मराठी मध्ये पाहिजे असेल तर पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो तुम्ही मिळू शकता. ” लेक लाडकी योजना फॉर्म मराठी :pdf

6. लेक लाडकी योजना सुरू झाली का ?

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्राची महत्त्वाकांशी मुलींसाठी असणारी योजना आहे. या योजनेची सुरुवात ही एक एप्रिल 2023 पासून झालेली आहे. सध्या या योजनेमध्ये नोंदणी चालू आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या भागातील किंवा गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन हा फॉर्म भरायचा आहे.

7. लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे ?

लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्रातील ज्या मुलींचा जन्म 01 एप्रिल 2023 नंतर झालेला आहे. तसेच त्यांच्या घरातील पाण्यामध्ये एक किंवा दोन नंबरला आहे. त्या सर्व मुली या लेक लाडकी योजनेसाठी पात्र आहेत. या लेक लाडकी योजनेचा प्रमुख उद्देश मुलींचे सक्षमीकरण करणे आहे. या योजनेमध्ये मुलीचे शिक्षणापासून तर लग्नापर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे.

8. लेक लाडकी योजना कधी सुरू झाली ?

? लेक लाडकी योजना ही बजेट 2023 मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बजेट भाषणामध्ये उल्लेखित केली. आणि नंतर एक जीआर येऊन या योजनेची 2023 पासून सुरुवात झाली.

Krushi Bajarbhav Team

Recent Posts

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : ‘या’ ठिकाणी साध्या कागदावर अर्ज करा आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवा ! Mukhya Mantri Annapurna Yojana

महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…

1 month ago

ग्रामपंचायत घरकुल यादी 2024-25 डाउनलोड करा मोबाईल मध्ये | Grampanchayat Gharkul Yadi 2024-25 Download PDF in Mobile (PMAY-G)

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…

1 month ago

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply |

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…

7 months ago

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट योजना अर्ज असा करा Free Tablet Yojana Maharashtra

Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना…

9 months ago

या जिल्ह्यात पुन्हा बांधकाम कामगार यांना भांडी वाटप सुरुवात Kamgar Bhandi Yojana Online Registration

Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…

9 months ago

सरकार देत आहे घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान, रूफ टॉप सोलर योजना महाराष्ट्र असा अर्ज करा

solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे.…

9 months ago