आता मोफत MSCIT कॉम्प्युटर कोर्स | फ्री एम एस सी आय टी कोर्स | Sarthi Free MSCIT Course Scheme

Sarthi Free MSCIT Course Scheme : नमस्कार, मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत जर तुम्ही मराठा किंवा कुणबी मराठा या समाजातील मोडत असाल तर एक आनंदाची बातमी आहे शासनामार्फत या समाजातील विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर कोर्स ही योजना सरकारने आणलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सारथी या संस्थेमार्फत या कोर्ससाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये 2024 मध्ये साधारण 40,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही या मराठा तसेच कुणबी मराठा समाजामध्ये मोडत असाल तर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. अर्ज कोठे करायचा, कॉम्प्युटर कोर्स कोठे करायचा आणि या योजनेत संदर्भात आपण माहिती पुढे पाहणार आहोत.

Sarthi Free MSCIT Course Scheme सारथी मोफत कॉम्प्युटर कोर्स

मित्रांनो, ‘ सारथी ‘ ही संस्था मराठा आणि कुणबी मराठा या समाजासाठी किंवा या समाजातील विद्यार्थ्यांसाठी बनवलेली एक संस्था आहे. तसे पाहिले तर प्रत्येक समाजासाठी वेगवेगळी संस्था बनवली आहे. यामध्ये तुम्ही जर एससी किंवा एसटी असाल तर ‘ बार्टी ‘ ही संस्था बनवली आहे. त्यानंतर ओबीसी आणि व्ही. जे. आणि एन. टी. समाजातील समाजासाठी ‘ महाज्योती ‘ ही संस्था बनवली आहे. इतर समाजासाठी सुद्धा विविध संस्था काम करत आहेत. या संस्था महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आहेत. या संस्थेंना पैसा पुरवठा हा महाराष्ट्र शासनाकडूनच दिला जातो.

पुणे येथील सारथी ही संस्था आणि एमकेसीएल mkcl पुणे यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे मराठा समाजातील तसेच कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर कोर्स योजना सारथी आणली आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा संपूर्ण कोर्स निशुल्क असणार आहे.

बातमी पहा :

मराठा तसेच कुणबी आणि मराठा कुणबी या समाजातील 18 ते 45 वयोगटातील विद्यार्थ्यांकडून हे अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी नॉन क्रिमिलियर ची मर्यादा सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही [ https://www.mkcl.org/csmsdeep ] च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन करता येत नसेल तर तुमच्या आसपास असणाऱ्या एमएससीआयटी सेंटर मध्ये MSC IT CENTRE मध्ये जाऊन हा अर्ज करायचा आहे किंवा ‘ सारथी मोफत कॉम्प्युटर कोर्स ‘ FREE SARATHI COMPUTER COURSE संदर्भात त्यांच्याकडे विचारणा करायची आहे.

Sarthi free Computers Course Online Apply link : [ https://sarthi.mkcl.org/applicant/#/registration ]

Sarthi free Computers Course Applicant Login : [ https://sarthi.mkcl.org/applicant/#/login ]

Find Nearest Sarathi Free Computer course Institute ( Authorised Sarthi free computers insitutes, search by pincode, place ) : https://searchcenter.mkcl.org/sarthi

Sarthi Free MSCIT Course Scheme
Sarthi Free MSCIT Course Scheme

Free Computer Course फ्री कॉम्प्युटर कोर्स Document

  • फोटो सहित अर्ज
  • किमान दहावी पास ( आवश्यक शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र )
  • जातीचे प्रमाणपत्र, जर मराठा जातीचे प्रमाणपत्र नसेल तर EWS प्रमाणपत्र.
  • एक वर्ष उत्पन्नाचा दाखला
  • जन्म दाखला
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र – मागील तीन वर्षाचे
  • रहिवासी असलेले प्रमाणपत्र – तहसीलदार
  • उमेदवाराचे फोटो आणि सही.

Free Computer Course

योजना सारथी मोफत कॉम्प्युटर कोर्स
प्रशिक्षण ठिकाण ए एल सी ( जवळचे एम एस सी आय टी सेंटर )
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
संकेत स्थळ https://www.mkcl.org/csmsdeep
Email ID sarthi mkclcsmsdeep@mkcl.org
Contact number Sarthi mkcl+918956537496
Sarthi free Computers course information

बातमी पहा :

Leave a Comment