नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यासाठी बांधकाम इमारत व इतर कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन आहे. या बांधकाम कामगार महामंडळामार्फत जे महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आहेत त्यांना विविध सुविधा किंवा योजना दिले जात आहेत. यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांना आर्थिक योजना, सामाजिक योजना, शैक्षणिक योजना तसेच आरोग्य योजना दिले जात आहेत. जे बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
बांधकाम कामगार यांना https://mahabocw.in/ या वेबसाईटवर 90 दिवसाचे मागील वर्षी काम केलेले प्रमाणपत्र दिल्यानंतर या सर्व योजना त्यांना दिले जात आहेत. यामध्ये शैक्षणिक योजनेमध्ये जर बांधकाम कामगारांचे पाल्य शिक्षण घेत असेल तर त्यांना 2500 रुपये पासून ते 1 लाखापर्यंत शैक्षणिक योजना दिली जात आहे. त्यामुळे या महामंडळामार्फत बांधकाम कामगारांना मोठा फायदा होत आहे. तुम्ही पाहिले असेल की नुकतेच बांधकाम कामगार यांना पेटी वाटप तसेच संसार उपयोगी भांडी वाटप योजना देण्याचे काम चालू आहे. तर या योजनेमुळे बांधकाम कामगारांना एक आर्थिक फायदा होत आहे.
नुकतेच महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये राज्यांमध्ये जे विविध असंघटित कामगार आहेत ज्याच्यामध्ये शेतमजूर आहेत, किंवा शेती संदर्भात काम करणारे जे लेबर आहेत , पशुपालक आहेत, दुग्ध व्यवसायिक आहेत किंवा दुधाचे ट्रान्सपोर्ट करणारे , जे ड्रायव्हर आहेत, किंवा जे घरगुती कामगार आहेत यामध्ये तुम्ही स्वयंपाक करणारे किचनला मदत करणारे किंवा सेक्युरिटी गार्ड, तसेच जीबीडी कामगार आहेत,
गाड्या धुणारे, हमाल, डबेवाला ढाबे वाला, जेवण पोचवणारे, गारमेंट तयार करणारे, कलर देणारे, कपडे धुणारे, सुतार, न्हावी, वडार, वंजारी, कोळी, धनगर, पत्रकार यामध्ये जे जर्नलिस्ट आहेत, लिहिणारे इंटरव्यू घेणारे, कॅमेरामन , अँकर, स्क्रिप्ट डायरेक्टर,
तसेच हॉस्पिटल मध्ये काम करणारे कामगार, लॉन्ड्री वाले, वेटर, डेकोरेशन करणारे, पार्लर वाले, ड्रेसिंग करणारे, हेअर ड्रेसिंग करणारे, मेहंदी काढणारे, पिक्चर मध्ये काम करणारे , लेबर, नाटकामध्ये काम करणारे तसेच तेथील कामगार, कंस्ट्रक्शन मध्ये काम करणारे कामगार, तसेच कन्स्ट्रक्शन संदर्भात सर्व काम करणारे मजूर कारागीर सर्व यामध्ये येतात,
शिक्षक, कोचिंग सर्विस वाले, दगडफुडी, शिक्षक ट्युशन वाले, डांसर केबल टीव्ही ऑपरेटर, आर्टिस्ट मासे पकडणारे, रस्त्यावर प्रदर्शन करणारे, मच्छीमार फिश मॅन, विक्रीच्या संदर्भात असणारे कामगार, बेकरीच्या संदर्भात असणारे कामगार, जंगलामध्ये काम करणारे लेबर, तसेच जे इतर कामगार आहेत जे असंघटित क्षेत्रात काम करतात त्या सर्वांचा समावेश या योजनेमध्ये होतो आपण यादी पुढे जाऊन पाहणारच आहे.
👉👉 शेतमजूर आणि जे असंघटित कामगार आहेत यांच्यासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापनेचा जीआर. येथे क्लिक करून पहा 👈👈 ( link 1 )
👉👉 शेतमजूर आणि जे असंघटित कामगार आहेत यांच्यासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापनेचा जीआर. येथे क्लिक करून पहा 👈👈 ( link 2 )
शासन या ठिकाणी असं म्हणतात की, जे असंघटित क्षेत्रात काम करतात म्हणजे ज्यांची नोंदणी नोंदणी इतरत्र कोठे झाली नाही किंवा त्यांच्यासाठी कोणी झटत नाही ते सर्व असंघटित क्षेत्रामध्ये येतात. यामध्ये शेती क्षेत्र आहे , उद्योग क्षेत्र ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर काम केले जातात, तसेच आपण जी वर लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये असणारे सर्व कामगार किंवा शेतमजूर यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे ” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ “.
” महाराष्ट्र शासन या ठिकाणी असं म्हणते की, महाराष्ट्र मध्ये असंघट क्षेत्रात काम करणारे जे कामगार आहेत जसे की शेतमजूर आहेत, बांधकाम कामगार आहेत, घरेलू कामगार आहेत, पत्रकार आहेत, ड्रायव्हर आहेत, खोदकाम करणारे आहेत. इतर जे सर्व कामगार. तर महाराष्ट्र मध्ये जे असंघटित कामगार संघटना आहेत तसेच जे लोकप्रतिनिधी आहेत ते महाराष्ट्र शासनाकडे वारंवार प्रत्येकासाठी वेगवेगळे महामंडळ स्थापन करावे. यासाठी पाठपुरावा करत होते.
पण शासन या ठिकाणी असं म्हणते की प्रत्येकाला वेगवेगळे महामंडळ स्थापन करणे ऐवजी सर्व समावेशक एकच महामंडळ स्थापन करून तिला आपण ” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ असे नाव दिले जावे. . जेणेकरून सर्वजण या महामंडळांतर्गत येतील. त्यामुळे इथून पुढे जे बांधकाम कामगार महामंडळ आहे किंवा घरेलू कामगार महामंडळ आहे किंवा इतर जे महामंडळ आहेत ते सर्व बंद होऊन आता एकच सर्वसामावेशक ” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ ” स्थापन होणार आहे ” .
28 जून 2023 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र मध्ये जे असंघटित कामगार आहेत ते आर्थिक दृष्ट्या जे कमकुवत घटक आहेत त्या सर्वांना जसे की बांधकाम कामगारांना जास्त सुविधा भेटतात त्या सर्व सुविधा सर्व असंघटित कामगारांसाठी लागू होणार आहे. यामध्ये असंघटित कामगार कोण याची यादी याच जीआर मध्ये ( पेज नंबर -3,4, 5 ) वर दिलेली आहे.
तसेच हे जे महामंडळ स्थापना होणार आहे याचे नाव देखील महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ असे करावे.
असंघटित कामगार हे शेती संदर्भात शेतमजूर किंवा इतर, बांधकाम लेबर, घरेलू कामगार दवाखान्यामध्ये असणारे लेबर, हॉटेल्स मध्ये असणारे बर, पेंटर, ड्रायव्हर कुकिंग करणारे. सर्व प्रकारचे कामगार या योजने मध्ये येतात.
वर दिलेले सर्व नावे हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये येतात ( ही यादी तुम्ही महाराष्ट्र शासनामार्फत आलेला जीआर दिनांक सहा जुलै 2023 रोजी ” राज्यातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याबाबत ” या नावाने आलेल्या जीआर पाहू शकता. यामध्ये व्यवस्थित अशी माहिती कामगार कोण असतील हे तुम्हाला जीआर मध्ये पेज नंबर 3,4 आणि 5 यावर पाहायला भेटेल )
किंवा जीआर नंबर 202307061808180010 यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता ( किंवा डायरेक्ट लिंक आहे यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता )
👉👉 शेतमजूर आणि जे असंघटित कामगार आहेत यांच्यासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापनेचा जीआर. येथे क्लिक करून पहा 👈👈 ( link 1 )
महाराष्ट्र शासनाने सहा जुलै 2023 रोजी जो असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी जीआर काढला आहे त्या सर्व कामगारांना ज्या बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळतो त्या सर्व योजनांचा लाभ या संघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार आहे. येत्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ या नावाची आता तुम्हाला जिल्ह्याचे ठिकाणी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ असे नाव दिसेल.
बांधकाम कामगारांना ज्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आणि आरोग्य विषयक योजना भेटत होत्या. यामध्ये जवळजवळ 30 प्रकारची योजना आहेत . त्या सर्व योजना आता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना दिले जाणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारे कोण कामगार आहेत या संदर्भात आपण यादी वर पाहिलेली आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ |
योजनेची सुरुवात | 06 जुलै 2023 |
योजनेची लाभार्थी | महाराष्ट्रातील रहिवासी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार |
योजनेचा लाभ होणार आहे | महिला आणि पुरुष तसेच आधी सर्वांना आहे |
नोंदणीचा फायदा | महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला या महामंडळाकडून पुरवण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजना चा फायदा घेता येणारे यामध्ये सामाजिक, आर्थिक, आरोग्य, आणि शैक्षणिक योजनेचा फायदा घेता येणार आहे. |
नोंदणी | महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाकडे नोंदणीही ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. |
महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ हे महाराष्ट्र शासनामार्फत 06 जुलै 2023 रोजी एका जीआर द्वारे याची स्थापना झाली आहे या कामगार कल्याण महामंडळामार्फत जे असंघटित कामगार आहेत त्यांना कल्याणकारी योजना पुरवणे या मागचा उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये सर्व प्रकारचे असंघटित कामगार येतात यामध्ये शेती संदर्भात असणारे कामगार, कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार, दुग्ध व्यवसायात काम करणारे कामगार, वन क्षेत्रात काम करणारे कामगार, घरामध्ये काम करणारे कामगार, बांधकाम कामगार, मूव्हीज अँड थिएटर मध्ये काम करणारे कामगार, हॉस्पिटल आणि त्यासंबंधी क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार, हॉटेल आणि त्या संदर्भात असणारे व्यवसाय टुरिझम या संदर्भात काम करणारे कामगार, खाणकाम, मच्छीमारी मासेमारी, आधी सर्व ठिकाणी जिथे जिथे असंघटित क्षेत्र आहे त्या सर्व ठिकाणचे असणारे कामगार याच्या मध्ये समाविष्ट आहेत.
महाराष्ट्र राज्यांमध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात यामध्ये शेतमजूर किंवा शेती संदर्भात असणारे कामगार दुग्ध व्यवसाय वन क्षेत्रात करणारे काम हॉटेल क्षेत्रात काम करणारे आधी सर्व जे असंघटित क्षेत्र आहे त्या ठिकाणी काम करणारे सर्व कामगार या क्षेत्रामध्ये येतात. तरी या असंघटित कामगारांसाठी सरकारने नुकतेच” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन केले आहे” या महामंडळामार्फत असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्व कामगारांना सामाजिक योजना, आर्थिक योजना, शैक्षणिक योजना तसेच आरोग्य योजना या योजनेचा लाभ मिळतो. जी सुरुवातीला बांधकाम कामगार यांना योजनेचा लाभ मिळत होता त्या सर्व त्या सर्व योजनांचा समावेश आता या असंघटित कामगार कल्याणकारी महामंडळ मध्ये करण्यात आलेला आहे. पुढे जाऊन आता हे बांधकाम इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ बंद होऊन आता सर्व स्तरातील वेगवेगळे महामंडळाचे एकच सर्वसमावेशक असे ” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ ” असे नाव देण्यात येणार आहे.
हो, महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये शेतमजुराचा समावेश होतो. या शेतमजुरा सोबत शेती संदर्भात अवजारे चालवणारे, औषध मारणारे किंवा शेती संदर्भात जे इतर कामे आहेत ते सर्व कामगारांचा समावेश या योजनेमध्ये होतो. या शेतमजुरा सोबत जे इतर असंघटित कामगार आहेत हॉस्पिटल असतील, बँकिंग, आयटी, दुग्ध व्यवसाय, बांधकाम मजूर, घरेलू कामगार किंवा इतर जे सर्व कामगार या सर्वांचा समावेश या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये होतो.
महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ याची स्थापना, महाराष्ट्र शासन, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांना मार्फत 06 जुलै 2023 रोजी निघालेल्या ” राज्यातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापना करणे बाबत ” या जीआर द्वारे झालेली आहे. या जीआर चा नंबर ” 202307061808180010 ” असा आहे.
जर संदर्भात जास्तीच्या माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती पाहू शकता.
👉👉 शेतमजूर आणि जे असंघटित कामगार आहेत यांच्यासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापनेचा जीआर. येथे क्लिक करून पहा 👈👈 ( link 1 )
👉👉 शेतमजूर आणि जे असंघटित कामगार आहेत यांच्यासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापनेचा जीआर. येथे क्लिक करून पहा 👈👈 ( link 2 )
या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जिल्ह्याच्या डब्ल्यू एफ सी किंवा कामगार विभागाकडे किंवा उपयुक्त कामगार विभाग यांच्याकडे चौकशी करू शकता. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…
Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना…
Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…
solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे.…