शेतमजूर तसेच जे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, त्यांना बांधकाम कामगार प्रमाणे सर्व योजना मिळणार ! महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापना झाली. Shetmajur Asanghatit Kamgar Kalyan Mahamandal Sthapana

नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यासाठी बांधकाम इमारत व इतर कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन आहे. या बांधकाम कामगार महामंडळामार्फत जे महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आहेत त्यांना विविध सुविधा किंवा योजना दिले जात आहेत. यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांना आर्थिक योजना, सामाजिक योजना, शैक्षणिक योजना तसेच आरोग्य योजना दिले जात आहेत. जे बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

Table of Contents

महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ Asanghatit Kamgar Kalyan Mahamandal

बांधकाम कामगार यांना https://mahabocw.in/ या वेबसाईटवर 90 दिवसाचे मागील वर्षी काम केलेले प्रमाणपत्र दिल्यानंतर या सर्व योजना त्यांना दिले जात आहेत. यामध्ये शैक्षणिक योजनेमध्ये जर बांधकाम कामगारांचे पाल्य शिक्षण घेत असेल तर त्यांना 2500 रुपये पासून ते 1 लाखापर्यंत शैक्षणिक योजना दिली जात आहे. त्यामुळे या महामंडळामार्फत बांधकाम कामगारांना मोठा फायदा होत आहे. तुम्ही पाहिले असेल की नुकतेच बांधकाम कामगार यांना पेटी वाटप तसेच संसार उपयोगी भांडी वाटप योजना देण्याचे काम चालू आहे. तर या योजनेमुळे बांधकाम कामगारांना एक आर्थिक फायदा होत आहे.

नुकतेच महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये राज्यांमध्ये जे विविध असंघटित कामगार आहेत ज्याच्यामध्ये शेतमजूर आहेत, किंवा शेती संदर्भात काम करणारे जे लेबर आहेत , पशुपालक आहेत, दुग्ध व्यवसायिक आहेत किंवा दुधाचे ट्रान्सपोर्ट करणारे , जे ड्रायव्हर आहेत, किंवा जे घरगुती कामगार आहेत यामध्ये तुम्ही स्वयंपाक करणारे किचनला मदत करणारे किंवा सेक्युरिटी गार्ड, तसेच जीबीडी कामगार आहेत,

गाड्या धुणारे, हमाल, डबेवाला ढाबे वाला, जेवण पोचवणारे, गारमेंट तयार करणारे, कलर देणारे, कपडे धुणारे, सुतार, न्हावी, वडार, वंजारी, कोळी, धनगर, पत्रकार यामध्ये जे जर्नलिस्ट आहेत, लिहिणारे इंटरव्यू घेणारे, कॅमेरामन , अँकर, स्क्रिप्ट डायरेक्टर,

तसेच हॉस्पिटल मध्ये काम करणारे कामगार, लॉन्ड्री वाले, वेटर, डेकोरेशन करणारे, पार्लर वाले, ड्रेसिंग करणारे, हेअर ड्रेसिंग करणारे, मेहंदी काढणारे, पिक्चर मध्ये काम करणारे , लेबर, नाटकामध्ये काम करणारे तसेच तेथील कामगार, कंस्ट्रक्शन मध्ये काम करणारे कामगार, तसेच कन्स्ट्रक्शन संदर्भात सर्व काम करणारे मजूर कारागीर सर्व यामध्ये येतात,

शिक्षक, कोचिंग सर्विस वाले, दगडफुडी, शिक्षक ट्युशन वाले, डांसर केबल टीव्ही ऑपरेटर, आर्टिस्ट मासे पकडणारे, रस्त्यावर प्रदर्शन करणारे, मच्छीमार फिश मॅन, विक्रीच्या संदर्भात असणारे कामगार, बेकरीच्या संदर्भात असणारे कामगार, जंगलामध्ये काम करणारे लेबर, तसेच जे इतर कामगार आहेत जे असंघटित क्षेत्रात काम करतात त्या सर्वांचा समावेश या योजनेमध्ये होतो आपण यादी पुढे जाऊन पाहणारच आहे.

Shetmajur Bandhkam Kamgar Mahamandal Sthapana
Shetmajur Bandhkam Kamgar Mahamandal Sthapana

शासन या ठिकाणी असं म्हणतात की, जे असंघटित क्षेत्रात काम करतात म्हणजे ज्यांची नोंदणी नोंदणी इतरत्र कोठे झाली नाही किंवा त्यांच्यासाठी कोणी झटत नाही ते सर्व असंघटित क्षेत्रामध्ये येतात. यामध्ये शेती क्षेत्र आहे , उद्योग क्षेत्र ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर काम केले जातात, तसेच आपण जी वर लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये असणारे सर्व कामगार किंवा शेतमजूर यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे ” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ “.

महाराष्ट्र शासन या ठिकाणी असं म्हणते की, महाराष्ट्र मध्ये असंघट क्षेत्रात काम करणारे जे कामगार आहेत जसे की शेतमजूर आहेत, बांधकाम कामगार आहेत, घरेलू कामगार आहेत, पत्रकार आहेत, ड्रायव्हर आहेत, खोदकाम करणारे आहेत. इतर जे सर्व कामगार. तर महाराष्ट्र मध्ये जे असंघटित कामगार संघटना आहेत तसेच जे लोकप्रतिनिधी आहेत ते महाराष्ट्र शासनाकडे वारंवार प्रत्येकासाठी वेगवेगळे महामंडळ स्थापन करावे. यासाठी पाठपुरावा करत होते.

पण शासन या ठिकाणी असं म्हणते की प्रत्येकाला वेगवेगळे महामंडळ स्थापन करणे ऐवजी सर्व समावेशक एकच महामंडळ स्थापन करून तिला आपण ” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ असे नाव दिले जावे. . जेणेकरून सर्वजण या महामंडळांतर्गत येतील. त्यामुळे इथून पुढे जे बांधकाम कामगार महामंडळ आहे किंवा घरेलू कामगार महामंडळ आहे किंवा इतर जे महामंडळ आहेत ते सर्व बंद होऊन आता एकच सर्वसामावेशक ” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ ” स्थापन होणार आहे.

शासन निर्णय : असंघटित कामगारांसाठी Asanghatit Kamgar Kalyan Mahamandal GR

28 जून 2023 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र मध्ये जे असंघटित कामगार आहेत ते आर्थिक दृष्ट्या जे कमकुवत घटक आहेत त्या सर्वांना जसे की बांधकाम कामगारांना जास्त सुविधा भेटतात त्या सर्व सुविधा सर्व असंघटित कामगारांसाठी लागू होणार आहे. यामध्ये असंघटित कामगार कोण याची यादी याच जीआर मध्ये ( पेज नंबर -3,4, 5 ) वर दिलेली आहे.

तसेच हे जे महामंडळ स्थापना होणार आहे याचे नाव देखील महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ असे करावे.

असंघटित कामगार हे शेती संदर्भात शेतमजूर किंवा इतर, बांधकाम लेबर, घरेलू कामगार दवाखान्यामध्ये असणारे लेबर, हॉटेल्स मध्ये असणारे बर, पेंटर, ड्रायव्हर कुकिंग करणारे. सर्व प्रकारचे कामगार या योजने मध्ये येतात.

महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे Asanghatit Kamgar Kalyan Mahamandal Registration Important Document

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • कुटुंबाचे आधार कार्ड
  • असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या संदर्भात स्वयंघोषणापत्र किंवा ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी काम केल्याचा पुरावा.

असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार कोण आहेत Asanghatit Kamgar Kalyan Mahamandal Kamgar list ?

  • शेती काम करणारे व शेतमजूर
  • मध गोळा करणारे
  • फुलांचे व्यवसाय करणारे.
  • कॉफी व चहा शेतमजूर यामध्ये काम करणारे.
  • शेतीचे अवजारे चालवणारे.
  • पशुपालन करणारे.
  • पोल्ट्री फार्म चालवणारे.
  • दुग्ध व्यवसाय करणारे.
  • दुधाच्या गाड्या चालवणारे.
  • दुग्ध व्यवसाय संदर्भात असणारे सर्व मजूर.
  • ड्रायव्हर,
  • कार ड्रायव्हर तसेच सायकल रिक्षा चालवणारे
  • हाताने गाडा ओढणारे.
  • बस , कार, ऑटो, टॅक्सी, ट्रक, टेम्पो हे सर्व चालवणारे ड्रायव्हर व मालक.
  • घरगुती कामगार जसे की स्वयंपाक करणारे.
  • कुक
  • सेक्युरिटी गार्ड
  • गाड्या धुणारे.
  • बिडी कामगार,
  • सिगारेट कामगार.
  • डबेवाले.
  • हँडलूम किंवा कपडे धुणारे.
  • चिकन कापणारे
  • कपडे धुणारे.
  • कलर देणारे.
  • पत्रकारितेमधील पत्रकार
  • जर्नलिस्ट.
  • लेखन करणारे.
  • इंटरव्यू घेणारे.
  • कॅमेरा मॅन
  • लेखन लिहिणारे
  • स्क्रिप्ट डायरेक्टर.
  • फ्रीलान्सर.
  • प्रोमोटर
  • हॉस्पिटल संदर्भात असणारे कामगार केटरिंग
  • ऑफिस क्लीन करणारे धोबी
  • नर्सेस.
  • हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये काम करणारे मजूर.
  • हाउसकीपिंग लॉन्ड्री आणि वेटर .
  • हॉटेलमध्ये पाणी देणारे.
  • बँकिंग संदर्भात जे अकाउंट हाताळणारे.
  • बँकिंग एजंट
  • कॅशियर
  • क्लर्क आणि अकाउंटंट त्या संदर्भात सर्व काम करणारे.
  • ई-कॉमर्स.
  • आर्थिक सल्लागार.
  • इन्कम टॅक्स ॲडव्हायझर.
  • शेअर मार्केट ब्रोकर.
  • इन्शुरन्स एजंट.
  • त्यानंतर पार्लर संदर्भात ब्युटीशियन
  • सलून आणि पार्लर मजूर
  • हे ड्रेसिंग करणारे.
  • हातावर मेंदी काढणारे.
  • त्यानंतर पिक्चर किंवा मूव्हीज मध्ये काम करणारे मजूर
  • यामध्ये कॅमेरा मॅन
  • चित्रपट शूटिंग करणारे
  • ऍक्टर मॉडेल.
  • त्यानंतर बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन संदर्भात काम करणारे मजूर
  • कन्स्ट्रक्शन लेबर
  • डॅम बनवणारे, ब्रिज बनवणारे, रोड बनवणारे
  • स्विमिंग पूल बनवणारे गोल कोर्स बनवणारे पेडल बनवणारे .
  • जमीन खोदकाम करणारे.
  • एसी नीट करणारे, कुलर नीट करणारे, वॉशिंग मशीन नीट करणारे, गिझर नीट करणारे.
  • मशीन चालवणारे
  • मार्बल बसवणारे
  • पेंटर
  • प्लंबर
  • सेक्युरिटी गार्ड
  • वाळू खोदकाम करणारे
  • खडी फोडणारे
  • दगड फोडणारे स्टाईल्स बसवणारे टनल वर्क
  • वेल्डर
  • त्यानंतर शिक्षण संदर्भात असणारे तसेच काम करणारे यामध्ये शिक्षक
  • कोचिंग सर्विस वाले
  • शिक्षण मित्र
  • गाण्याची शिक्षक
  • त्यानंतर मनोरंजन क्षेत्रात काम करणारे यामध्ये आवाज देणारे कामगार
  • बँड पथक किंवा बँड वाले
  • केबल टीव्ही ऑपरेटर
  • सर्कस आर्टिस्ट
  • डान्सर
  • मॅजिशियन
  • गीतकार लेखक
  • मॉडेल आणि अॅक्टींग करणारे अॅक्टर
  • फॉल्क आर्टिस्ट
  • गीतकार आणि जॉकी
  • मच्छीमार संदर्भात असणारे मच्छिमार
  • मच्छिमार प्रोसेसिंग मध्ये काम करणारे कामगार.
  • त्यानंतर अन्न प्रोसेसिंग कामगार
  • स्नेक बनवणारे कामगार
  • पापड बनवणारे कामगार
  • मेकिंग मध्ये कामगार
  • डाळ दळून देणारे कामगार.
  • तांदूळ दळून देणारे
  • यानंतर ट्रान्सपोर्ट करणारे यामध्ये भाजीपाला मार्केटला पाठवणारे
  • बटर त्यानंतर चिकन त्यानंतर मटन सप्लाय करणारे
  • अंडे सप्लाय करणारे
  • मासे आणि समुद्र वनस्पती सप्लाय करणारे
  • फळे पाठवणारे.
  • त्यानंतर वन भागात काम करणारे मजूर
  • वेंडरिंगची काम करणारे
  • कोकोनट वॉटर वेंडर
  • पानवाला
  • न्यूज पेपर वाला
  • फ्रुट ज्यूस वाला
  • पुलाचे दुकान असणारे
  • ठेला वाला
  • बूट पॉलिश करणारे
  • कपडे विकणारे सेलर
  • रस्त्यावर भाजीपाला विकणारे
  • चहाचे दुकान चालवणारे
  • आरोग्य संदर्भात सर्विस देणारे आशा व अंगणवाडी वर्कर
  • आरोग्य सेविका
  • मध्यान भोजन बनवणारे
  • ऑर्डर
  • मिड डे मिल मध्ये काम करणारे
  • त्यानंतर आयटी आणि संदेशवहन या क्षेत्रात काम करणारे कॉल सेंटर
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • आयटी सेक्टर
  • टेलिफोन बूथ चालवणारे
  • वेब डेव्हलपर
  • कॉम्प्युटर आणि लॅपटॉप नीट करणारे
  • आपले सरकार सेवा केंद्र चालवणारे
  • कॉम्प्युटर ऑपरेटर
  • नेटवर्किंग चालवणारे
  • त्यानंतर मॉल आणि शॉप यामध्ये काम करणारे कामगार
  • किराणा चालवणारे
  • बायसिकल आणि रिक्षा नीट करणारे
  • इलेक्ट्रिशियन
  • जनरेटर रिपेरिंग करणारे
  • बुक बाइंडिंग करणारे
  • मेकॅनिक
  • मोबाईल रिपेअर करणारे तसेच मोबाईल शॉप मध्ये काम करणारे कामगार
  • फोटो फ्रेम तयार करणारे
  • गॅस स्टोव्ह कुकर इतर जे मशीन आहेत ते नीट करणारे कामगार.
  • दुकान चालवणारे तसेच करणारे
  • शॉप किपर
  • टेलर किंवा कपडे शिवणारे
  • रेडिओ टीव्ही इलेक्ट्रॉनिक नीट करणारे
  • ब्रश तयार करणारे
  • गिझर नीट करणारे
  • वीट बांधकाम संदर्भात असणारे कामगार
  • कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार
  • फॅक्टरीमध्ये तसेच फायरवर्कमध्ये काम करणारे कामगार
  • सोने तयार करण्यामध्ये काम करणारे किंवा त्या संदर्भात असणारे कामगार
  • मशीन नीट करणारे
  • म्युझिकल इन्स्ट्रुमेंट करणारे
  • तेल गोळा करणारे
  • पेपर तयार करणारे
  • प्लास्टिक तयार करणारे
  • प्रिंटिंग प्रेस तयार करणारे
  • माचीस बॉक्स तयार करणारे
  • रोप तयार करणारे
  • साबण तयार करणारे
  • टॉय तयार करणारे
  • ड्रिलिंग मशीन चालवणारे तसेच वेल्डिंग क्षेत्रात काम करण्यास सर्व कामगार
  • पॉलिशिंग करणारे
  • त्यानंतर मेडिकल आणि त्या संदर्भात असणाऱ्या कंपन्यामध्ये काम करणारे मजूर
  • डेंटल असिस्टंट
  • कंपाऊंड
  • डेंटिस्ट तसेच न्यूट्रिशननिस्ट
  • फिटनेस जिम ट्रेनर
  • नर्स
  • पॅरामेडिकल स्टाफ
  • सायकोथेरपिस्ट
  • एक्स-रे ऑपरेशन
  • पॅथॉलॉजी डायग्नोस्टिक यामध्ये काम करणारे यामधील लॅब टेक्निशियन, पॅथॉलॉजी टेक्निशियन त्यानंतर एक्स-रे टेक्निशन.
  • त्यानंतर फार्मसी संदर्भात किंवा कंपन्या संदर्भात काम करणारे मजूर
  • केमिस्ट
  • फार्मासिस्ट
  • त्यांचा फार्मासिटिकल इंडस्ट्री मध्ये काम करणारे कामगार.
  • त्यानंतर प्रोफेशनल सर्विस मध्ये काम करणारे यामध्ये इंजिनियर
  • लॅबोरेटरी असिस्टंट
  • लॉयर
  • स्टेनोग्राफर
  • मीटर रिडींग करणारे
  • टायपिंग चालवणारे
  • फोटोग्राफर
  • वॉचमन
  • आरो टेक्निशियन
  • त्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप आणि एनजीओज
  • खेळा संदर्भात असणाऱ्या कंपन्या यामध्ये काम करणारे
  • अंपायर
  • स्पोर्ट कोच
  • स्पोर्ट पर्सन
  • स्पोर्ट किंवा खेळ या संदर्भात वापरले जाणारे वस्तू तयार करणारे
  • थेटर किंवा ड्रामा मध्ये काम करणारे रेकॉर्डिंग टेक्निशियन
  • थेटर स्पॉट बाय
  • कॅडी
  • थेटर मध्ये म्युझिक सेटअप करणारे
  • थेटर मध्ये बॅक स्टेज काम करणारे
  • मॉडेल आणि ट्रॅक्टर
  • टुरिझम आणि त्या संदर्भात काम करणारे टुरिस्ट गाईड
  • टूरिस्ट आणि हॉस्पिटल िटी
  • एलपीजी गॅस पुरवठा करणारे
  • ट्रॅव्हल एजंट
  • योगा ट्रेनर
  • प्लेट ट्रेनर
  • होमगार्ड आणि त्या संदर्भात काम करणारे
  • पार्ट टाइम मध्ये काम करणारे किंवा कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणारे किंवा पार्ट टाइम म्हणून काम करणारे

वर दिलेले सर्व नावे हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये येतात ( ही यादी तुम्ही महाराष्ट्र शासनामार्फत आलेला जीआर दिनांक सहा जुलै 2023 रोजी ” राज्यातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याबाबत ” या नावाने आलेल्या जीआर पाहू शकता. यामध्ये व्यवस्थित अशी माहिती कामगार कोण असतील हे तुम्हाला जीआर मध्ये पेज नंबर 3,4 आणि 5 यावर पाहायला भेटेल )

असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोणत्या योजनेस लाभ मिळेल

महाराष्ट्र शासनाने सहा जुलै 2023 रोजी जो असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी जीआर काढला आहे त्या सर्व कामगारांना ज्या बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळतो त्या सर्व योजनांचा लाभ या संघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार आहे. येत्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ या नावाची आता तुम्हाला जिल्ह्याचे ठिकाणी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ असे नाव दिसेल.

बांधकाम कामगारांना ज्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आणि आरोग्य विषयक योजना भेटत होत्या. यामध्ये जवळजवळ 30 प्रकारची योजना आहेत . त्या सर्व योजना आता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना दिले जाणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारे कोण कामगार आहेत या संदर्भात आपण यादी वर पाहिलेली आहे.

महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ Highlight

योजनेचे नाव महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ
योजनेची सुरुवात 06 जुलै 2023
योजनेची लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार
योजनेचा लाभ होणार आहे महिला आणि पुरुष तसेच आधी सर्वांना आहे
नोंदणीचा फायदा महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला या महामंडळाकडून पुरवण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजना चा फायदा घेता येणारे यामध्ये सामाजिक, आर्थिक, आरोग्य, आणि शैक्षणिक योजनेचा फायदा घेता येणार आहे.
नोंदणी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाकडे नोंदणीही ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

FAQ महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ

1. महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ हे काय आहे ?

महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ हे महाराष्ट्र शासनामार्फत 06 जुलै 2023 रोजी एका जीआर द्वारे याची स्थापना झाली आहे या कामगार कल्याण महामंडळामार्फत जे असंघटित कामगार आहेत त्यांना कल्याणकारी योजना पुरवणे या मागचा उद्देश आहे.

2. महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ यामध्ये कोणत्या प्रकारचे कामगार येतात ?

महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये सर्व प्रकारचे असंघटित कामगार येतात यामध्ये शेती संदर्भात असणारे कामगार, कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार, दुग्ध व्यवसायात काम करणारे कामगार, वन क्षेत्रात काम करणारे कामगार, घरामध्ये काम करणारे कामगार, बांधकाम कामगार, मूव्हीज अँड थिएटर मध्ये काम करणारे कामगार, हॉस्पिटल आणि त्यासंबंधी क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार, हॉटेल आणि त्या संदर्भात असणारे व्यवसाय टुरिझम या संदर्भात काम करणारे कामगार, खाणकाम, मच्छीमारी मासेमारी, आधी सर्व ठिकाणी जिथे जिथे असंघटित क्षेत्र आहे त्या सर्व ठिकाणचे असणारे कामगार याच्या मध्ये समाविष्ट आहेत.

3. महाराष्ट्र राज्य मध्ये असणाऱ्या असंघटित कामगारांसाठी कोणती योजना आहे ?

महाराष्ट्र राज्यांमध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात यामध्ये शेतमजूर किंवा शेती संदर्भात असणारे कामगार दुग्ध व्यवसाय वन क्षेत्रात करणारे काम हॉटेल क्षेत्रात काम करणारे आधी सर्व जे असंघटित क्षेत्र आहे त्या ठिकाणी काम करणारे सर्व कामगार या क्षेत्रामध्ये येतात. तरी या असंघटित कामगारांसाठी सरकारने नुकतेच” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन केले आहे” या महामंडळामार्फत असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्व कामगारांना सामाजिक योजना, आर्थिक योजना, शैक्षणिक योजना तसेच आरोग्य योजना या योजनेचा लाभ मिळतो. जी सुरुवातीला बांधकाम कामगार यांना योजनेचा लाभ मिळत होता त्या सर्व त्या सर्व योजनांचा समावेश आता या असंघटित कामगार कल्याणकारी महामंडळ मध्ये करण्यात आलेला आहे. पुढे जाऊन आता हे बांधकाम इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ बंद होऊन आता सर्व स्तरातील वेगवेगळे महामंडळाचे एकच सर्वसमावेशक असे ” महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ ” असे नाव देण्यात येणार आहे.

4. महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये शेतमजुराचा समावेश होतो का ?

हो, महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये शेतमजुराचा समावेश होतो. या शेतमजुरा सोबत शेती संदर्भात अवजारे चालवणारे, औषध मारणारे किंवा शेती संदर्भात जे इतर कामे आहेत ते सर्व कामगारांचा समावेश या योजनेमध्ये होतो. या शेतमजुरा सोबत जे इतर असंघटित कामगार आहेत हॉस्पिटल असतील, बँकिंग, आयटी, दुग्ध व्यवसाय, बांधकाम मजूर, घरेलू कामगार किंवा इतर जे सर्व कामगार या सर्वांचा समावेश या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये होतो.

5. महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाची स्थापना कधी झाली ?

महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ याची स्थापना, महाराष्ट्र शासन, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांना मार्फत 06 जुलै 2023 रोजी निघालेल्या ” राज्यातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापना करणे बाबत ” या जीआर द्वारे झालेली आहे. या जीआर चा नंबर ” 202307061808180010 ” असा आहे.

जर संदर्भात जास्तीच्या माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती पाहू शकता.

या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जिल्ह्याच्या डब्ल्यू एफ सी किंवा कामगार विभागाकडे किंवा उपयुक्त कामगार विभाग यांच्याकडे चौकशी करू शकता. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

असंघटित कामगार यांसाठी महा मंडळ स्थापन And Bandhkam kamgar list
असंघटित कामगार यांसाठी महा मंडळ स्थापन And Bandhkam kamgar list
असंघटित कामगार यांसाठी महा मंडळ स्थापन And Bandhkam kamgar list
असंघटित कामगार यांसाठी महा मंडळ स्थापन And Bandhkam kamgar list
असंघटित कामगार यांसाठी महा मंडळ स्थापन And Bandhkam kamgar list
असंघटित कामगार यांसाठी महा मंडळ स्थापन And Bandhkam kamgar list
असंघटित कामगार यांसाठी महा मंडळ स्थापन And Bandhkam kamgar list
असंघटित कामगार यांसाठी महा मंडळ स्थापन And Bandhkam kamgar list

Leave a Comment