News

प्राथमिक शाळेचा विद्यार्थी प्रवेश निर्गम उतारा काय आहे ? पहा | Nirgam utara in pdf

Nirgam utara in pdf : नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी शाळेमध्ये पूर्वीपासूनच विविध दाखले दिले जात आहेत, यामध्ये बोनाफाईड असेल, विद्यार्थी प्रवेश अहवाल, शाळा सोडल्याचा दाखला, शाळेत शिकत असलेला अहवाल आणि विद्यार्थी प्रवेश निर्गम प्रमाणे नोंदणी रजिस्टर अर्थात याला प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा किंवा रजिस्टर म्हटलं जातं.

प्राथमिक शाळेचा विद्यार्थी प्रवेश निर्गम उतारा

मित्रांनो आज आपण प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी प्रवेश निर्गम रजिस्टर याबद्दल माहिती पाहणार आहोत. या प्राथमिक शाळेच्या निर्गम रजिस्टर मध्ये काय काय नोंदी असतात आणि याचा वापर कोठे केला जाऊ शकतो याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. चला तर माहिती पाहू !

Nirgam utara in pdf : प्राथमिक शाळेचा विद्यार्थी प्रवेश निर्गम उतारा हा फक्त प्राथमिक शाळेतूनच तिला जाऊ शकतो. माध्यमिक शाळेमध्ये तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला मिळतो. किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतं ! माध्यमिक शाळेमध्ये शाळा सोडल्याचा दाखला हा परत मिळू शकतो जरी हरवला असला तरी ! पण यासाठी तुम्हाला एक नवीन अर्ज करावा लागतो. आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा शाळा सोडल्याचा दाखला दिला जातो पण त्यावर डुबलीकेट असा शेरा दिलेला असतो. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हा दाखला परत दिलेला आहे.

पण प्राथमिक शाळेत शाळा सोडल्याचा दाखला जर घ्यायचा असेल. तर हा डुबलीकेट शेरा येत नाही. तुम्ही अर्ज केल्यानंतर शाळेतून काही शिल्लक रक्कम मागणी केल्यानंतर हा दाखला तुम्हाला नवीनच दिला जातो. हा फरक आहे दोन्ही दाखल्यामध्ये.

Nirgam utara in pdf

प्राथमिक शाळेचा विद्यार्थी प्रवेश निर्गम उतारा नोंदी काय काय असतात

Nirgam utara in pdf : मित्रांनो, प्राथमिक शाळेचा ‘ विद्यार्थी प्रवेश निर्गम प्रमाणे नोंदणी रजिस्टर ‘ हा दाखला घेताना तुम्हाला प्राथमिक शाळा कडे सुरुवातीला अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर शाळेकडून तुम्हाला जर तुमच्या शाळा शिकत असल्या नोंदी हे नोंदणी रजिस्टर मध्ये असेल, तरच हा दाखला दिला जातो. आता आपण ह्या दाखल्यांमध्ये काय काय नोंदी असतात हे पाहू ! या दाखल्यामध्ये

📝 हि माहिती पण पहा :  पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 , असा करा अर्ज लगेच मिळेल पिठाची गिरणी...

  1. तुमचा ‘ प्रवेश अनुक्रमांक ‘ असतो.
  2. त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये ‘ विद्यार्थ्यां चे संपूर्ण नाव आडनावासह ‘ हे असते.
  3. तिसऱ्या कॉलम मध्ये ‘ वडिलांचे नाव / वडील हयात नसल्यास पालकाचे नाव ‘ असते.
  4. त्यानंतर चौथ्या कॉलम मध्ये ‘ जात संदर्भात ‘ उल्लेख असतो.
  5. त्यानंतर पाचव्या कॉलम मध्ये ‘ वडील अथवा पालकांचा व्यवसाय ‘ लिखित असतो.
  6. त्यानंतर सहाव्या कॉलम मध्ये ‘ मातृभाषा ‘ या संदर्भात माहिती असते.
  7. सातव्या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांचा ‘ प्रवेश दिनांक ‘ असतो. म्हणजे ज्या तारखेला विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतलेला आहे. ती तारीख या ठिकाणी असते.
  8. आठव्या आणि नव्या कॉलम मध्ये ( 8th & 9th ) मध्ये ‘ जन्म दिनांक ‘ लिहिलेला आहे. आठव्या मध्ये जन्म दिनांक अंकात आहे तर नव्या कॉलम मध्ये जन्मदिनांक अक्षरांमध्ये आहे.
  9. दहाव्या 10th कॉलम मध्ये विद्यार्थ्यासंदर्भात जन्मस्थळाबद्दल माहिती असते. यामध्ये विद्यार्थ्यांचे ‘ जन्मस्थळ तालुकाजिल्हा ‘ या संदर्भात लिहावे लागते.
  10. अकराव्या 11th कॉलम मध्ये विद्यार्थ्याने प्रवेश च्या वेळी कोणत्या वर्गात प्रवेश घेतला ( प्रवेश समयी वर्ग ) संदर्भात माहिती असते.
  11. बाराव्या कॉलम मध्ये जर विद्यार्थ्याने या शाळेत येण्यापूर्वी दुसऱ्या शाळेत प्रवेश असेल तर या ठिकाणी ती माहिती भरावी लागते. ( पूर्वीच्या शाळेचे नाव )
  12. तेराव्या १३th त्यानंतर ‘ पूर्वीच्या शाळेची इयत्ता ‘ ही माहिती भरावी लागते.
  13. 14व्या कॉलम मध्ये ‘ प्रवेश देणाऱ्या अधिकाऱ्याची सही ‘ असते.
  14. पंधराव्या कॉलम मध्ये विद्यार्थी या शाळेतून कोणत्या वर्गातून गेला म्हणजे ‘ निर्गम समई वर्ग ‘ ही माहिती असते.
  15. त्यानंतर 16 व्या कॉलम मध्ये विद्यार्थी कोणत्या तारखेला गेला ती तारीख ‘ निर्गम दिनांक ‘ ही असते.
  16. 17 व्या कॉलम मध्ये या विद्यार्थ्याने ‘ शाळा सोडल्याचे कारण ‘ हे लिहायचे असते किंवा ही माहिती त्याच्यामध्ये असते.
  17. 18 व्या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांचे ‘ परिचय चिन्ह विद्यार्थ्यांचे थोडक्यात दोन चिन्ह ‘ हे असते. याला आपण ओळख चिन्ह सुद्धा म्हणतो.
  18. 19 व्या कॉलम मध्ये ‘ निर्गम समई निर्गम ची नोंद घेणाऱ्या अधिकाराची सही ‘ ही नोंद असते.
  19. विसाव्या 20th कॉलम मध्ये ‘ मुख्याध्यापकांची स्वाक्षरी ‘ असते.
  20. 21 वा कॉलम हा शेवटचा कॉलम आहे. यामध्ये विद्यार्थ्यासंदर्भात इतर ‘ विवरण ‘ माहिती भरायचे असते. किंवा विद्यार्थ्यासंदर्भात इतर माहिती असते.

📝 हि माहिती पण पहा : घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० % 📝

👉👉विद्यार्थी प्रवेश निर्गमन उतारा किंवा रजिस्टर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

प्राथमिक शाळेचा विद्यार्थी प्रवेश निर्गम उतारा वापर कशासाठी होतो

प्राथमिक शाळेचा विद्यार्थी प्रवेश निर्गमन उतारा हा विविध कामासाठी वापरला जाऊ शकतो. या उताऱ्याद्वारे किंवा रजिस्टरद्वारे या विद्यार्थ्यांची ओळख पटू शकते. त्यानंतर यावर उल्लेख असलेला जन्म दिनांक हा सुद्धा गृहीत धरला जातो. सोबतच विद्यार्थ्यांचे शिक्षण किती झाले आहे यावरून माहिती मिळते. याचा वापर

  • आधार कार्डवर जन्मतारीख दुरुस्तीसाठी होऊ शकतो.
  • मतदान कार्ड मिळवण्यासाठी सुद्धा होतो.
  • जातीचा दाखला काढण्यासाठी याची मदत होते. कारण पूर्वजांचे जन्म नोंद रजिस्टर हे फक्त ग्रामपंचायत मध्ये जन्माचा दाखला किंवा शाळेचा निर्गमन उतारा यावरच पाहायला मिळते.
  • ओळख दाखवण्यासाठी सुद्धा होते.

👉👉विद्यार्थी प्रवेश निर्गमन उतारा किंवा रजिस्टर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

📝 हि माहिती पण पहा :  शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन 📝

Krushi Bajarbhav Team

Share
Published by
Krushi Bajarbhav Team

Recent Posts

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : ‘या’ ठिकाणी साध्या कागदावर अर्ज करा आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवा ! Mukhya Mantri Annapurna Yojana

महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (Mukhya…

1 month ago

ग्रामपंचायत घरकुल यादी 2024-25 डाउनलोड करा मोबाईल मध्ये | Grampanchayat Gharkul Yadi 2024-25 Download PDF in Mobile (PMAY-G)

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY-G ही योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरु झाली. या…

1 month ago

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply |

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक…

7 months ago

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट योजना अर्ज असा करा Free Tablet Yojana Maharashtra

Free Tablet Yojana Maharashtra : नमस्कार , महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना…

9 months ago

या जिल्ह्यात पुन्हा बांधकाम कामगार यांना भांडी वाटप सुरुवात Kamgar Bhandi Yojana Online Registration

Kamgar Bhandi Yojana Online Registration : जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार…

9 months ago

सरकार देत आहे घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान, रूफ टॉप सोलर योजना महाराष्ट्र असा अर्ज करा

solar rooftop yojana : नमस्कार, मित्रांनो दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचे लोड शेडिंग चालू आहे.…

9 months ago