पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 | असा करा अर्ज नक्कीच पिठाची गिरणी मिळेल | pithachi girni yojana maharashtra 2024

नमस्कार मंडळी, केंद्र सरकार तसे राज्य सरकार जनतेसाठी विविध योजना आणत असते. या योजनेमार्फत जे लोक यामध्ये पात्र होतात, किंवा लाभार्थी होतात त्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो. महाराष्ट्र सरकारने जनतेसाठी अनेक प्रकारचे योजना आणल्या आहेत. यामध्ये एकदा अर्ज भरल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळतो. pithachi girni in marathi उदाहरणार्थ – झेरॉक्स मशीन अर्ज, पिठाची गिरणीचा अर्ज, कडबा कुट्टी अर्ज, सायकल मिळवण्यासाठी अर्ज, स्कुटी मिळवण्यासाठी अर्ज, लॅपटॉप मिळवण्यासाठी अर्ज, संजय गांधी योजनेचा अर्ज, पिको फॉल मशीन इत्यादी. असे अनेक प्रकारचे अर्ज केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळत असतो. आज आपण ‘ पिठाची गिरणी योजना ‘ हे अनुदान कसे मिळवायचे यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 pithachi girni yojana maharashtra 2024

मंडळी, महाराष्ट्र शासनामार्फत ‘ महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत, या पिठाच्या गिरणीच्या अर्ज स्वीकारले जातात ( जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या विभागामार्फत ). सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये या पिठाच्या गिरणीच्या अर्ज स्वीकारले जात आहेत. नुकतेच बुलढाणा , सोलापूर , आहिल्यानगर, पुणे, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, सांगली, रायगड, पालघर, नंदुरबार, नागपूर, यवतमाळ, बीड, वाशिम, वर्धा, भंडारा गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पिठाच्या गिरणीचे आणि झेरॉक्स मशीनचे अर्ज स्वीकारले जात आहेत.

या जिल्ह्यांमध्ये जर कोणाला लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी, pithachi girni in marathi त्यांच्या भागातील तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जाऊन ‘ पिठाच्या गिरणीचा अर्ज ‘ जमा करायचा आहे. जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतील तर त्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत ‘ महिला व बाल कल्याण विभाग ‘ यामध्ये जाऊन पिठाच्या गिरणीचा अर्ज जमा करायचा आहे. हा अर्ज तुम्हाला या लेखाच्या खाली मिळणार आहे. (प्रत्येक जिल्ह्यानुसार हा अर्ज थोडाफार वेगळा आहे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच हा अर्ज मिळवायचा असेल तर पंचायत समितीच्या बाहेर असणाऱ्या झेरॉक्स सेंटर मध्ये अर्ज तुम्हाला मिळेल, नाहीतर तुम्ही हा अर्ज महिला व बालकल्याण विभाग या विभागातील कर्मचाऱ्यांकडे विनंती करून अर्ज मिळू शकता.

📝 हि बातमी पहा : पीएम विश्वकर्मा योजना संपूर्ण माहिती , असा अर्ज करा आणि मिळवा 15,000 रुपये मोफत Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply 📝

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 पात्रता, कोणाला मिळेल लाभ ? pithachi girni yojana maharashtra 2024 Eligibility And Beneficiary ?

मंडळी, पिठाची गिरणी योजना अनुदान 2024, या योजनेसाठी त्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, किंवा त्या तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा लाभार्थी होऊ शकतो. पण शासनाने यामध्ये थोडाफार बदल केलेला आहे. आता हे अनुदान घेताना यामध्ये अपंग महिला, अपंग व्यक्ती, विधवा, अनाथ तसेच मुली यांच्यापैकी जर कोणी अर्ज केला असेल तर त्यांना प्राधान्याने क्रमवारी देऊन त्यांचा अर्ज लवकरच स्वीकारला जातो.

त्याची गिरणी योजना जर तुम्हाला यामध्ये लाभार्थी व्हायचा असेल तर हा अर्ज घरातील महिलेच्या नावाने करा किंवा जर कोणी अपंग असेल तर त्या नावाने केल्यास तर 100 टक्के तुम्हाला अनुदान भेटेल. शक्यतो महिलांच्या नावाने हा अर्ज करा.

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 उद्देश

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024, ही पिठाची गिरणी / चक्की देताना शासन अनेक गोष्टी पाहते आणि यातून लाभार्थीचा हेतू साधायचा असतो तो खालील प्रमाणे.pithachi girni for business

  • महाराष्ट्र मध्ये असणाऱ्या अनाथ, अपंग, महिला यांना हे अनुदान देऊन सामाजिक तसेच आर्थिक पाठबळ देणे हे त्यामागे प्रमुख उद्देश आहे.
  • महिला ह्या दैनंदिन कामांमध्ये घरामध्ये बऱ्याचदा व्यस्त असतात ( ग्रामीण महिला ). घर कामासोबत त्यांना एक चांगला रोजगार मिळावा हा प्रमुख उद्देश शासनाने ठरवलेला आहे. ( pithachi girni mahiti )
  • महिलांना ग्रामीण भागात रोजगार दिल्यानंतर महिलांचे सामाजिक तसेच आर्थिक जीवनमान सुधारते किंवा उंचावते.
  • पिठाची गिरण दिल्यानंतर अनाथ, किंवा महिला असेल तर ते या व्यवसायामधून स्वतःचा आर्थिक हेतू सुधारू शकतात. यामुळे ते आत्मनिर्भर बनतात.
  • पिठाची गिरणी मिळवल्यानंतर महिलांच्या आर्थिक उत्पन्नात नक्कीच वाढ होते. यामुळे बऱ्याचदा पिठाची गिरणी मिळवण्यासाठी महिलाच पुढाकार घेतात. आणि हे 90 ते 100 टक्के अनुदानावर मिळत असते. ( प्रत्येक जिल्ह्यानुसार हे वेगवेगळे अनुदान आहे. )pithachi girni for business

📝 हि बातमी पहा : आता लग्न करणार्यांना आनंदाची बातमी, सरकार देत आहे 25,000 रुपये मदत. घरात कोणाचे लग्न होत असेल तर करा आर्ज आणि मिळवा 25,000रुपये 📝

Free-Flour-Mill-Yojana-Maharashtra-pithachi-girni-yojana-maharashtra-2024
Free-Flour-Mill-Yojana-Maharashtra-pithachi-girni-yojana-maharashtra-2024

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ? pithachi girni yojana maharashtra 2024 Important Document ?

मंडळी, पिठाची गिरणी योजना 2024, हे अनुदान घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता आहे. पिठाची गिरणी मिळवायचे असेल तर खालील प्रमाणे कागदपत्रे लागतील. ( pithachi girni mahiti )

  • पिठाची गिरणी योजना 2024 अर्ज
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला.
  • अपंग दाखला, विधवा दाखला, अनाथ दाखला ( असेल तर ).
  • प्रतिज्ञापत्र.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • शौचालय असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला.
  • गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
  • पंचायत समिती विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
  • बालविकास प्रकल्प कार्यालय यांचे प्रमाणपत्र.

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 अर्ज देताना वरील सर्व कागदपत्रांची झेरॉक्स त्या अर्जाला जोडून देणे अनिवार्य आहे. जर कागदपत्रे त्याला जोडले नाही तर तुमचा ‘ पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 ‘ हा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 सारांश pithachi girni yojana maharashtra 2024 Highlight

पिठाची गिरणी योजना 2024 , अर्ज कसा करणार यासंदर्भात थोडक्यात चार्टद्वारे माहिती पाहू.

योजना पिठाची गिरणी योजना 2024
उद्देश अपंग, अनाथ आणि महिलांना स्वयं रोजगार मिळवा हा त्यामागे प्रमुख उद्देश होता.
लाभार्थी अपंग, अनाथ आणि महिला ( गरीब कुटुंबातील )
लाभ पिठाची गिरणी मिळेल
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन फक्त
कोठे अर्ज जमा करणार पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ( महिला व बालकल्याण विभाग मध्ये) स्वतः जमा करावा
गिरणी मिळवण्यासाठी अंदाजे खर्च 90 ते 100% अनुदान याला मिळते.
पद्धत पहिल्यांदा गिरणीचे कोटेशन काढावे लागते ( ग्रामसेवक सोबत फोटो ), ते जमा केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात. त्यानंतर पिठाची गिरणी घेऊ शकता.

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024, पिठाची गिरण अर्ध रद्द होण्याचे कारणे pithachi girni yojana maharashtra 2024 Rejected Reasons

पिठाची गिरणी योजना 2024, या योजनेला अर्ज केल्यानंतर सर्वांनाच पिठाची गिरणी मिळते असं काही नसते. 50 ते 60 टक्के लोकांना या अनुदानाचा लाभ साधारण मिळतो. 30 ते 40 टक्के अर्ज / लोकांचे अर्ज यामध्ये बाद होतात . याचे कारणही तसेच आहेत. ते खालील प्रमाणे.

  • पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 मिळवताना हा अर्ज बऱ्याचदा बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्र बाहेरून आलेला असतो यामुळे सुद्धा तुमचा बाद/ रद्द/ रिजेक्ट होऊ शकतो.
  • पिठाची गिरणी योजना अनुदान मिळवण्यासाठी – हा अर्ज करताना त्यामध्ये अर्धवट माहिती टाकलेली असते. कागदपत्रांची जोडणी केलेली नसते. किंवा अर्ज सोबत सर्व कागदपत्रे नसतात.
  • हा अर्ज बऱ्याचदा पुरुषच भरतात, शासनाचे या ठिकाणी उद्देश असा आहे की, अर्ज स्वीकारताना यामध्ये प्रायोरिटी ठरलेली आहे सुरुवातीला अपंग, त्यानंतर अनाथ आणि शेवटी महिला ह्या असतात ( यामध्ये काही प्रमाणात एससी / एसटी आरक्षण असते ). ओपन मधील पुरुषांनी हा अर्ज केल्यावर हा लवकर स्वीकारला जात नाही.
  • पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 -अर्ज करताना बऱ्याचदा एकाच घरातील दोन व्यक्ती अर्ज करतात, किंवा एकदा लाभ घेतल्यानंतर परत घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. हे लक्षात आल्यानंतर हा अर्ज ते नाकारू शकतात.

मुळात अर्जामध्ये चुकीची माहिती किंवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे हा अर्ज नाकारण्याचे प्रमाण जास्त आहे.

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 अर्ज करण्याची पद्धत Procedure Of Pithachi girni Yojana 2024 And Flour Mill Yojana 2024

पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 मिळवताना एक पद्धतीने तुम्ही अर्ज करा. यामुळे तुमचा अर्ज स्वीकारला जाऊ शकतो. ती खालील प्रमाणे.

  • पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 मिळवताना पहिला हा अर्ज तुमच्या जिल्ह्यातून पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामधून मिळवा. किंवा जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती याबाहेर असणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर हा अर्ज तुम्हाला मिळेल. हा अर्ज त्यांच्याकडून झेरॉक्स मारून घ्या.
  • प्रत्येक जिल्ह्याचा हा अर्ज वेग वेगळा असतो. त्यामुळे हा अर्ज करताना ( भरताना ) यामध्ये कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते एकदा व्यवस्थित पहा. अर्ज शक्यतो जेल पेन यांना भरता . साध्या पेनाने अर्ज भरा. ( महत्त्वाचे अर्ज हा महिलेच्या नावाने भरा )
  • अर्ज भरल्यानंतर, त्या अर्जाला आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून त्याला जोडा. एकदा खात्री करून घ्या की सर्व कागदपत्रे जोडलेले आहे म्हणून.
  • अर्ज आणि त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची जोडणी झाल्यानंतर हा अर्ज तुम्ही तुमच्या तालुक्याचे ठिकाणी पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषद मध्येजाऊन ” महिला व बालकल्याण विभाग ‘ यामध्ये जमा करायचा आहे. जमा केल्यानंतर त्या अर्जाची तुम्ही पोहोच घ्या. पोज घेतल्यानंतर तुमच्याकडे प्रूफ राहतं की तुम्ही पंचायत समितीमध्ये अर्ज किंवा जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला आहे. या पोचद्वारेच तुम्ही तुमच्या अर्जाची वारंवार स्टेटस पाहू शकता किंवा विचारू शकता.
  • अर्ज जमा करताना त्यांच्याकडून एकदा खात्री करून घ्या की अर्जामध्ये सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडलेले आहेत की नाही. जोडलेले असेल तसेच अर्ज जमा केला आहे आणि पोहोच सुद्धा घेतली आहे. यानंतर त्यांना विचारा की हे पिठाच्या गिरणीचे अनुदान कधीपर्यंत येणार आहे. शक्यतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घ्या.
  • यानंतर काही दिवसातच तुम्हाला त्यांच्याकडून कळवण्यात येईल की तुमचा अर्ज स्वीकारला गेला आहे. ( ग्रामस्तरावर चौकशी झाल्यानंतर स्वीकारला जातो ).
  • त्यानंतर तुम्ही त्याचे कोटेशन काढू शकता. सोबत ग्रामसेवक यांना घेऊन त्या पिठाच्या गिरणीचा फोटो सुद्धा काढून घेऊ शकता. हे कोटेशन तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन जमा करा.
  • कोटेशन जमा केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवल्याचे समजेल. त्यानंतर या पैशांमधून तुम्ही पिठाची गिरणी घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. ( पिठाची गिरणी घेताना ग्रामसेवक यांचा दाखला किंवा फोटो ) तुम्हाला जमा करावा लागतो.
  • काही जिल्ह्यांमध्ये, असे आहे की आधी पिठाची गिरण घ्यावा लागते. त्या पिठाच्या गिरणीचे जीएसटी बिल तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावा लागते. त्यानंतर काही दिवसात तुम्हाला हे पैसे जमा होतात. ( पिठाच्या गिरणी साठी अनुदान हे 90 ते 100% यावर असते ) 15 ते 30 हजाराच्या दरम्यान तुम्ही घेऊ शकता. 20000 च्या वर जी रक्कम असेल ती तुम्हाला स्वतःला भरावी लागेल. काही जिल्ह्यांमध्ये हे अनुदान 15000 पर्यंत आहे.

FAQs Pithachi girni Yojana 2024 पिठाची गिरणी योजना अनुदान 2024

1. मोफत पिठाची गिरणी योजना 2024, ही योजना कोणत्या राज्यात सध्या चालू आहे ?

मोफत पिठाची गिरणी योजना 2024, ही योजना महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे. या योजनेचे अंमलबजावणी ही जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग तसेच पंचायत समिती यामध्ये महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवली जाते. या विभागामार्फत अर्ज गोळा केले जातात आणि वाटप सुद्धा केले जातात.

2. मोफत पिठाची गिरणी योजना 2024 या योजनेमध्ये लाभार्थी कोण आहेत, तसेच लाभ कोण घेऊ शकतो ?

मोफत पिठाची गिरणी योजना 2024 हा अर्ज करताना सरकारने काही प्रायोरिटी ठरवलेले आहेत. सुरुवातीला हे अर्ज अपंग महिला किंवा पुरुष असतील यांचे अर्ज मंजूर होतात. या अपंगांमध्ये जर कॅटेगिरी मधील असेल तर त्यांचे अर्ज मंजूर होतात. त्यानंतर अर्ज मंजूर करताना अनाथ यांचा विचार केला जातो. त्यानंतर अर्ज विचार करताना महिलांचा विचार केला जातो. त्यानंतर पुरुषांचे अर्ज मंजूर केले जातात. त्यामुळे मोफत पिठाची गिरणी योजना 2024 यामधील हे – अपंग, अनाथ, महिला तसेच पुरुष हे आहेत.

3. मोफत पिठाची गिरणी योजना 2024 या योजनेअंतर्गत किती टक्के अनुदान दिले जाते तसेच रक्कम किती भेटते ?

मोफत पिठाची गिरणी योजना 2024, या योजनेअंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये हे अनुदान 90 टक्के भेटते, तसेच काही महत्त्वाचे जिल्हे आहेत जसे की अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हे अनुदान 100 टक्के दिले जाते.

4. मोफत पिठाची गिरणी योजना 2024 अर्ज सोबत इतर महत्त्वाच्या कागदपत्रे कोणते लागतील ?

मोफत पिठाची गिरणी योजना 2024, या योजनेचा अर्ज करताना अर्ज सोबत, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, , मोबाईल नंबर ईमेल आयडी, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, इतर अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र लागतील. याची वर यादी दिलेली आहे.

👉👉👉 पिठाची गिरणी किंवा पिठाची चक्की मिळवण्यासाठी लागणारा अर्ज यासाठी ते क्लिक करा 👈👈👈

📝 Read Also.. महिलांना मिळणार आता वार्षिक 12000 रुपये, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 📝

📝 Read Also.. तुमच्या गावातील नवीन घरकुल यादी कशी पहायची 2024 📝

Leave a Comment