शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन Kisan Pension Yojana Marathi

Kisan Pension Yojana Marathi : नमस्कार शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकार तसेच राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक अनेक नवीन योजना आणत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी पी एम किसान योजना सुरू केली. या पीएम किसान योजनेमार्फत भारतातील सर्व पात्र शेतकऱ्यांना चार महिन्यातून 2,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पाठवले जातात. म्हणजे महिन्याला पाचशे रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतात.

या केंद्र सरकारच्या पीएम किसन योजनेप्रमाणे, महाराष्ट्र शासनाने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार महिन्यातून 2,000 रुपये मिळतात. म्हणजे महिन्याला पाचशे रुपये यातून मिळतात. पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे मिळून चार महिन्यातून 4,000 रुपये मिळतात म्हणजे महिन्याला या ठिकाणी 1,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळतात. या दोन्हीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ह्या मार्फत नक्कीच फायदा होत आहे.

Kisan Pension Yojana Marathi : भारत आपला कृषिप्रधान म्हणून देश ओळखला जातो. भारतामध्ये बहुतांश रोजगार हा शेती संदर्भातील आहे. त्यामुळे या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा लोकांसाठी शासनाने योजना आली. काढलेली आहे तिचे नाव आहे ” प्रधानमंत्री किसान मानधन योजना “. या योजनेची सुरुवात 12 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आलेली आहे. या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमार्फत शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये काही रक्कम गुंतवल्यास त्यांना सरकार 60 वर्षानंतर 3.000 रुपये एवढे पेन्शन देणार आहे. या प्रधानमंत्री किसान मानधन योजना , या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांचे वय हे 18 वर्षे ते 40 वर्षाच्या दरम्यान पाहिजे. 18 ते 40 वर्ष या वयात योजनेमध्ये 55 रुपयांपासून गुंतवणूक करून तुम्ही 60 वर्षानंतर 3,000 रुपये ही पेन्शन घेऊ शकता.

📝 हि बातमी पहा : पिठाची गिरणी योजना अनुदान 2024 , असा करा अर्ज लगेच मिळेल पिठाची गिरणी. 📝

प्रधानमंत्री किसान मानधन योजना, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ? Pradhanmantri Kisan Mandhan Yojana Document ?

प्रधानमंत्री किसान मानधन योजना, या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी काय कागदपत्रांची आवश्यकता असते. त्याची यादी खालील प्रमाणे आहे.

 • लाभार्थीचे आधार कार्ड.
 • पासपोर्ट साईज फोटो.
 • मोबाईल नंबर.
 • ईमेल आयडी.
 • उत्पन्नाचा दाखला.
 • वयाचा दाखला.
 • ओळखपत्र ( कोणतेही ).
 • बँक खाते पासबुक.

वरील सर्व कागदपत्र देऊन तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतात.

📝 हि बातमी पहा : बांधकाम कामगार महामंडळ बंद होणार, त्याऐवजी नवीन एकाच सर्वाना महामंडळ होणार 📝

Kisan Pension Yojana Marathi Pradhanmantri Kisan Mandhan Yojana
Kisan Pension Yojana Marathi Pradhanmantri Kisan Mandhan Yojana

प्रधानमंत्री किसान मानधन योजना, अर्ज कोठे करणार ? Kisan Pension Yojana Marathi, Pradhanmantri Kisan Mandhan Yojana Marathi ?

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये सामाविष्ट होण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल याची लिंक पुढे आहे. ( वेबसाईट लिंक – https://maandhan.in/ )

 1. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर ( वेबसाईट लिंकhttps://maandhan.in/ ) या.
 2. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर आवश्यक असणारे माहिती त्यामध्ये टाका.
 3. त्याच्यामध्ये आवश्यक असणारे माहिती टाकल्यानंतर, कागदपत्रे अपलोड करा !
 4. अपलोड केल्यानंतर, त्यानंतर ओटीपी जनरेट करा आणि ओटीपी त्यामध्ये टाका.
 5. ओटीपी टाकल्यानंतर आणि अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज पुढील प्रक्रियेला पाठवला जाईल. आणि तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता.

📝 हि बातमी पहा : आता लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकारमार्फत 25000 मिळणार , काय आहे योजना संपूर्ण माहिती पहा 📝

Leave a Comment