Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : नमस्कार , नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक योजना काढलेली आहे. या योजनेचे नाव आहे ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ या योजनेमार्फत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना काय आहे तसेच या योजनेसाठी पात्रता काय आहे, योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज कोठे करणार याबद्दल आपण माहिती पाहू.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मित्र आणि मैत्रिणींनो महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी बजेट 17 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आणि जीआर देखील याच दिवशी आलेला आहे. या जीआरमध्ये योजना कधी सुरू होणार, अर्ज कोठे करणार कोण कोणते कागदपत्रे लागणार तसेच अर्ज कोणत्या ठिकाणी करणार सविस्तर माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना भारतामध्ये सर्वप्रथम मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी वर्षापूर्वी आणली होती. या योजनेमधून मध्य प्रदेश मध्ये 12, 000 रुपये महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र मध्ये सुरू केली.
महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण करणे तसेच त्यांचे जीवनमान उंचावणे यामागे त्याचा उद्देश आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वकांशी योजनेमधून जुलै 2024 पासून पात्र महिलांना त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये 15 तारखेच्या आत 1500 रुपये जमा होणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लाडकी बहीण योजना पात्रता
- वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष
- महाराष्ट्रातील महिला रहिवासी पाहिजे.
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहे.
- पात्र महिलेकडे बँक पासबुक असणे गरजेचे आहे.
- पात्र महिलेच्या कुटुंबप्रमुखाचे उत्पन्न हे 2.5 लाख वार्षिक पेक्षा कमी पाहिजे.
📝 हि बातमी पहा : आता लग्न करणार्यांना आनंदाची बातमी, सरकार देत आहे 25,000 रुपये मदत. घरात कोणाचे लग्न होत असेल तर करा आर्ज आणि मिळवा 25,000रुपये 📝
Highlight Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजना राज्य | महाराष्ट्र शासनाने सुरू केली |
योजना वर्ष | सन 2024 पासून |
योजनेचा लाभ | 1500 रुपये प्रति महिना |
लाभ कोणाला | महाराष्ट्रातील पात्र महिलांना |
योजनेचे पात्रता | वय 21 ते 60 वर्ष, उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी, सरकारी नोकरदार नाही पाहिजे |
पहिला हप्ता सुरू | 14 ऑगस्ट 2024 पासून |
प्रत्येक महिन्याला पैसे कसे मिळणार | आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे मिळणार त्यासाठी बँकेमध्ये आधार लिंक करणे गरजेचे आहे |
प्रत्येक महिन्याला पैसे कधी मिळणार | प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत हे पैसे मिळणार |
ऑनलाइन अर्ज करण्यास कधी सुरुवात होणार आहे | एक जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरू होणार आहे |
📝 Read Also.. तुमच्या गावातील नवीन घरकुल यादी कशी पहायची 2024 📝
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अपात्र कोण आहेत /
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अपात्र खालील आहेत ?
- बाहेर राज्यातील महिला
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहेत ते सर्व महिला किंवा ते कुटुंब
- त्यांच्या घरांमध्ये किंवा ती महिला आयकर भरत असेल.
- ज्यांच्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये सदस्य हा नियमित/ कायम/कंत्राटी म्हणून सरकारी विभागामध्ये कार्यरत जर असेल किंवा भारत सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवा निवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत असेल ते सर्व अपात्र ठरणार आहेत.
- ज्या महिला पंधराशे पेक्षा जास्त रक्कम शासनामार्फत लाभ घेत असेल ते सर्व.
- ज्या कुटुंबामध्ये सदस्य हे जर खासदार किंवा आमदार असेल ते सर्व अपात्र ठरणार आहे.
- ज्या कुटुंबाचे सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार मध्ये संचालक कॉर्पोरेट बोर्ड किंवा अध्यक्ष-उपाध्यक्ष इत्यादी असल्या पदावर असतील तर त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ?
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
- हमीपत्र
- अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी निवड कशी केली जाणार ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी निवड करताना काही अटी व शर्ती दिलेले आहेत त्या खालील प्रमाणे
- ज्या महिला पात्र आहेत किंवा ज्यांचे वय 21 ते 60 वर्ष आहे त्या महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ( वरील पात्र व अपात्र धरून )
- अर्ज केल्यानंतर तो अर्ज संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे पडताळणीसाठी जाणार
- त्यांनी पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी हे त्याला मंजुरी देतील
- मंजूर झाल्यानंतर ते याद्या जाहीर केल्या जातील.
- याद्या जाहीर झाल्यानंतर महिला व बालविकास विभाग पुणे यांच्यामार्फत पात्र महिन्याच्या बँक खात्यावर डीबीटी DBT मार्फत 1500 रुपये जमा केले जाणार.
- अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी निवड केली जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची प्रक्रिया ladli behna yojana maharashtra online apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. लिंक ( ). या लिंक वर क्लिक करून तुम्ही या मध्ये आवश्यक ती माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
अर्ज करण्याची प्रक्रिया आहे संपूर्णपणे निशुल्क असणार आहे
अर्ज करताना जी पात्र महिला असणार आहे ती त्या ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे
अर्ज करतेवेळी त्या महिलेचे फोटो घेतले जाणार आहे. अर्जामध्ये कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड संदर्भात संपूर्ण माहिती टाकावा लागेल आणि आधार संदर्भात माहिती टाकावी लागेल अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून 1500 रुपये मिळू शकतात.