आता लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकारमार्फत 25000 मिळणार , काय आहे कन्यादान योजना संपूर्ण माहिती पाहू | कन्यादान योजना महाराष्ट्र | Kanyadan Yojana Maharashtra |

नुकतेच नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कन्यादान योजनेची घोषणा केलेली आहे, नेमकी कन्यादान योजना काय आहे, या कन्यादान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो या संदर्भात सविस्तरपणे आपण त्यामध्ये माहिती पाहू.

कन्यादान योजना महाराष्ट्र Kanyadan Yojana Maharashtra

नमस्कार मंडळी लग्न सोहळा म्हणलं की यामध्ये साखरपुडा प्री-वेडिंग पूजा रिसेप्शन आधी सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात या लग्न सोहळ्यामध्ये भरमसाठा मोठा खर्च होतो. हा लग्नाचा खर्च बऱ्याच कुटुंबासाठी म्हणता येईल की न पेलवणारा आहे. हा लग्न सोहळा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. यामुळे या लग्न सोहळा मध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही बाब लक्षात घेता, एक नवीन योजना काढली तिचं नाव आहे कन्यादान योजना, या कन्यादान योजनांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून जे जोडपे लग्न करणार आहेत त्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. सुरुवातीला ही मदत वर दहा हजार रुपये होती आता त्यामध्ये वाढ करून ती 25 हजार रुपयापर्यंत केलेली आहे किंवा या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे.

या कन्यादान योजनेच्या मुख्य उद्देश लग्न सोहळा मध्ये जो आर्थिक भार वाढतो ते कमी करणे हे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये पालघर मध्ये एका मेळाव्या दरम्यान याची घोषणा केली.

Kanyadan-yojana-Maharashtra
Kanyadan-yojana-Maharashtra

कन्यादान योजना म्हणजे काय ?

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. कन्यादान योजना ही जी जोडपे लग्न करणार आहेत त्यासाठी आहे. या लग्न सोहळ्यामध्ये जो अवाढव्य खर्च केला जातो त्याला फाटा देण्यासाठी किंवा तो बार कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन या जोडप्यांना 25 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत करणार आहे. ही योजना अनुसूचित जाती जमाती तसेच भटकी जमाती त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग त्यानंतर इतर मागासवर्गीय कुटुंब तसेच ओपन कॅटेगिरीतील जे जोडपे असणारे त्या सर्वांना ही योजना लागू असणार आहे. तुम्ही पाहिले असेल की जे बरेच लग्न सोहळा आहे हे सामुदायिक लग्न सोहळा पद्धतीने केले जातात. या सामुदायिक लग्न सोहळ्यामध्ये जे जोडपे सहभागी होतात त्यांना प्रत्येकी महाराष्ट्र शासनामार्फत आत्तापर्यंत दहा हजार रुपये मिळत होते आणि ज्या स्वयं सेवी संस्था हे आयोजन करीत होते त्या स्वयंसेवी संस्थांना महाराष्ट्र शासन प्रत्येक जोडपे मागे दोन हजार रुपये देत होते. आता ही रक्कम म्हणजे दहा हजार रुपये रक्कम वाढवून ती प्रत्येकी 25000 केली जाणार आहे.

कन्यादान योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही प्रमुख अटी

  • वधू व वर हे महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे
  • वराचे वय कमीत कमी 21 वर्षापेक्षा कमी नसावे
  • वधू व वर यांकडे जातीचे प्रमाणपत्र असावे.
  • हे जे दोन वधू वर आहेत यापैकी एक अनुसूचित जाती -जमाती तसेच मागासवर्गीय भटके जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावे.
  • हे जे नवीनदांपत्य आहे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत काही लेन देन केले नसावे. या संदर्भात त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते.

कन्यादान योजना या योजनेचे काय प्रमुख अटी आहेत

कन्यादान योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने काही प्रमुख अटी ठेवलेले आहेत या अटी पैकी पहिली अट म्हणजे हे जे अनुदान आहे ते फक्त पहिल्याच लग्नासाठी आहे उदाहरणार्थ जर एखादी विधवा महिला असेल तर तिला हे अनुदान मिळणार नाही. हे अनुदान फक्त नवीन जोडपे जे असणारे किंवा नवीन जोडपे लग्न करणार आहे त्यांच्यासाठीच लागू असणार आहे.

FAQ Kanyadan Yojana Maharashtra

महाराष्ट्राची कन्यादान योजना ही कोणासाठी आहे ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये पालघर येथे कन्यादान योजनेची घोषणा केली. ही कन्यादान योजना जे नवीन जोडपा आहे आणि लग्न करणार आहे त्यांच्यासाठी ही लागू असणार आहे .

कन्यादान योजना या योजनेमार्फत किती अनुदान दिले जाणार आहे ?

महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली कन्यादान योजना या योजनेमार्फत सुरुवातीला दहा हजार रुपये हे अनुदान दिले जात होते आता त्यामध्ये वाढ करून ती आता 25 हजार रुपये पर्यंत करण्यात आलेली आहे.

Leave a Comment