पुन्हा बांधकाम कामगार यांना भांडी मिळण्यास सुरुवात, या जिल्ह्यात वाटप पुन्हा सुरू Bandhkam Kamgar Bhandi Yojana Online Registration

Bandhkam Kamgar Bhandi Yojana : नमस्कार बांधकाम कामगार बंधूंनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांस मार्फत 13 फेब्रुवारी 2024 पासून ‘ जे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे ‘ नोंदणीकृत आहेत तसेच ज्यांचे बांधकाम कामगाराचे कार्ड सक्रिय आहे अशा बांधकाम कामगारांना सन 2024 पासून भांडी योजना सुरू करण्यात आली आहे. bandhkam kamgar या भांडी वस्तूंची किंमत ही 15,000 रुपये ते 20,000 रुपये एवढी आहे. या योजनेचा लाभ फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेला आहे. ही योजना 13 फेब्रुवारी 2024 ते 15 मार्च 2024 पर्यंत भांडी वाटप चालू होती. त्यानंतर ही योजना थोड्या कालावधीसाठी बंद करण्यात आली होती. पण आता मतदान झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये ही भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. भांड्याचे सेट मिळाले सुद्धा आहेत. कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.

bandhkam kamgar बांधकाम कामगार यांना भांडी मिळण्यास सुरुवात

Bandhkam Kamgar Bhandi Yojana : बांधकाम कामगार बंधूंनो, तुम्ही जर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत आहेत आणि अद्यापही तुम्हाला ‘ बांधकाम कामगार भांडी योजनेचा ‘ लाभ मिळालेला नाही. तर कामगार बंधूंनो bandhkam kamgar तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. लाभ घेण्यासाठी पद्धत खूप सोपी आहे. हा लाभ कसा घ्यायचा याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.

13 फेब्रुवारी 2024 पासून या योजनेचा लाभ सुरू झालेला होता. आणि हा लाभ 13 मार्चपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू होता. पण लोकसभा 2024 निवडणूक तारीख जाहीर झाल्यापासून म्हणजे मार्च 2024 पासून आचारसहिता सुरू झाली होती त्यामुळे ही भांडी योजना बंद करण्यात आली पण आता भांडी वाटप योजना ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. नुकतेच याचे वाटप सुरू झाले आहे. या जिल्ह्यात मतदान झाल्यानंतर भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तुमची नोंदणी ही ज्या जिल्ह्यामध्ये झाली आहे त्या जिल्ह्याच्या ‘ बांधकाम कामगार जिल्हा सुविधा केंद्र ‘ या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता.

bandhkam kamgar भांडी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. कामगाराचे कार्ड
  3. एक रुपयाची कामगाराची फी पावती
  4. भांडी मिळवण्यासाठी असणारा फॉर्म ( प्रपत्र ई )
  5. हमीपत्र
  6. रेशन कार्ड झेरॉक्स
  7. जाताना तारीख व वार यासाठीचा अर्ज.

bandhkam kamgar कोणासाठी ही योजना आहे ?

  • ज्या कामगारांनी ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई ‘ यांच्याकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि त्यांना स्मार्ट कार्ड तसेच एक रुपयाची पावती भेटली आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे
  • तसेच नोंदणी केल्यानंतर सुद्धा त्यांचे बांधकाम कामगाराचे कार्ड ( कामगाराची नोंदणी ) सक्रिय आहे अशा सर्वांना ही भांडी योजना आहे.
Bandhkam Kamagar Bhandi Vatap Yojana
Bandhkam Kamagar Bhandi Vatap Yojana

भांडी योजनेसाठी अर्ज कोणाकडे करावा ?

भांडी योजना मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला बांधकाम कामगार म्हणून ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई ‘ यांच्याकडे नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर ज्यावेळी बांधकाम कामगाराचे ऑनलाईन खाते चालू होईल तो मला बांधकाम कामगारांचे कार्ड मिळेल तसेच एक रुपयाची पावती मिळेल त्यावेळी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे ऑफिस यामध्ये जाऊन भांडी मिळवण्याचा अर्ज भरून द्यावा. भांडी मिळवण्याचा अर्ज दिल्यानंतर ते तुम्हाला एक तारीख आणि वार देतील. त्या तारखेला वर जे कागदपत्रे ( फॉर्म, आधार कार्ड, कामगाराची कार्ड, एक रुपयाची पावती ) सांगितले आहेत ते सर्व घेऊन पुन्हा त्याच ऑफिसमध्ये जाणे. तेथे गेल्यानंतर ते तुमचे डॉक्युमेंट घेऊन तसेच बायोमेटिक पद्धतीने नोंदणी करून आणि भांडी सोबत फोटो वगैरे घेऊन ते तुम्हाला भांडी किट देतील. ती भांडी किट घेऊन तुम्ही आपल्या घरी येऊ शकता.

kamgar yojana भांडी मिळवण्यासाठी खर्च किती येतो ?

ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई ‘ यांच्याकडे आहे तसेच त्यांचे खाते सक्रिय आहे अशा सर्वांना ‘ बांधकाम कामगार भांडी योजना ‘ किट पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. यासाठी कोणालाही एक रुपया द्यायची गरज नाही.

पण मध्यंतरी ही योजना चालू झाल्यानंतर अनेक एजंट मार्फत हे भांडे देण्यात आले. त्यामुळे 400 रुपये ते 1000 रुपये पर्यंत त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. पण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई या मार्फत ही योजना पूर्णपणे मोफत आहे.

Bandhkam Kamagar Bhandi Vatap Yojana
Bandhkam Kamagar Bhandi Vatap Yojana

maharashtra building and other construction workers welfare board अर्ज केल्यानंतर किती दिवसात भांडी मिळतात ?

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांकडे किंवा तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार ऑफिस यांच्याकडे भांडी मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला ‘ एका आठवड्याच्या तुम्हाला 30 नगाचे भांडी ‘ दिली जातात. bandhkam kamgar यापेक्षा जास्त काळ लागत नाही. अर्ज केल्यानंतर तुम्हाला लगेचच तिथे तारीख देतात. त्या तारखेला जिल्हा बांधकाम कामगार ऑफिस यांसकडे जाऊन तुम्ही भांडी मिळू शकतात.

maharashtra building and other construction workers welfare board बांधकाम कामगार भांडी योजना परत सुरू झाली आहे का ?

Bandhkam Kamgar Bhandi Yojana : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई मार्फत ही योजना फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली होती पण मार्चमध्ये आचारशी आचारसंहिता लागल्यानंतर ही भांडी योजना बंद करण्यात आली. पण ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले आहे त्या जिल्ह्यामध्ये आता परत ही भांडी योजना सुरू करण्यात आली आहे. या भांड्यांचा स्टॉप प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेला आहे पण आचारसंहितेचे कारण देऊन ही भांडी वाटप योजना बंद करण्यात आली होती. पण नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही भांडी योजना 14 मे पासून सुरू करण्यात आली आहे. आणि याचे वाटप सुद्धा सुरू झाले आहे.

kamgar yojana भांडी योजना Highlight

योजना बांधकाम कामगार यांना भांडी सेट योजना
सुरू 2024
कोणी सुरू केली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई
लाभ 30 नगाचा भांड्याचा सेट ( कुकर सह तीस भांड्याचा सेट )
खर्चमोफत
पात्रता
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांस कडे नोंदणी केली पाहिजे
भांडी मिळवण्यासाठी अर्ज पद्धत ऑनलाइन आणि ऑफलाइन
ऑनलाईन लिंक https://mahabocw.in/
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदारासह कुटुंबाचे आधार कार्ड, बँक पासबुक, 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र

बांधकाम कामगार भांडी योजना फॉर्म

बांधकाम कामगार यांना ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ मुंबई या मार्फत जी भांडी मिळतात यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागतो. bandhkam kamgar या फॉर्मची लिंक खाली आहे. हा फॉर्म भरून तुम्ही जिल्हा कामगार सुविधा केंद्र किंवा कामगार आयुक्त कार्यालयात ‘ सरकारी कामगार अधिकारी ‘ यांच्याकडे जमा करावा.

👉👉भांडी मिळवण्यासाठी तसेच वार व दिनांक काढण्यासाठी लागणारा अर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

बांधकाम कामगार यादी Pdf

  1. इमारती
  2. रेल्वे
  3. रस्ते
  4. सिंचन
  5. ट्रामवे
  6. रेडिओ
  7. एअरफील्ड
  8. पाण्याचे तलाव
  9. बोगदे
  10. जलाशय
  11. कल्व्हर्ट
  12. ब्रिज
  13. दूरदर्शन
  14. पूर नियंत्रणाची कामे (स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या कामांसह)
  15. धरण कालवे
  16. टेलिफोन
  17. तटबंध आणि नेव्हिगेशन कामे
  18. टेलिग्राफ आणि परदेशी संप्रेषण.
  19. तेल आणि वायू प्रतिष्ठापन
  20. पिढी
  21. पाणी बाहेर काढणे
  22. विजेचे पारेषण आणि वितरण
  23. जलवाहिनी
  24. लाइन पाईप
  25. टॉवर्स
  26. स्वयंचलित लिफ्टची स्थापना.
  27. गड कापणे, तोडणे आणि दळणे
  28. स्वयंपाक करण्यासारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मॉड्यूलर युनिट्सची स्थापना.
  29. वायरिंग, डिस्ट्रीब्युशन, टेंशनिंग इत्यादींसह इलेक्ट्रिकल काम.
  30. वीज ओळी
  31. लाइन पाईप
  32. सौर पॅनेल इत्यादी ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची स्थापना.
  33. सार्वजनिक उद्याने, पदपथ, नयनरम्य परिसर इत्यादींचे बांधकाम तयार करणे.
  34. काच कापणे, काच प्लास्टर करणे आणि काचेचे पॅनेल स्थापित करणे
  35. कारंजे स्थापना
  36. लोखंडी किंवा धातूच्या ग्रील्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे आणि स्थापित करणे
  37. सुरक्षा दरवाजे आणि उपकरणांची स्थापना.
  38. अग्निशामक यंत्रांची स्थापना आणि दुरुस्ती
  39. दगड कापणे, तोडणे आणि दळणे.
  40. पेंट, वार्निश इ. सह सुतारकाम.
  41. रोटरी बांधकाम
  42. सिंचन पायाभूत सुविधांचे बांधकाम.
  43. सुतारकाम, आभासी कमाल मर्यादा, प्रकाशयोजना, प्लास्टर ऑफ पॅरिससह अंतर्गत काम (सजावटीच्या कामासह).
  44. गटर आणि प्लंबिंगचे काम.
  45. कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत समाविष्ट नसलेल्या विटा, छप्पर इत्यादी तयार करणे.
  46. आधी सर्व.

बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय

नोंदणी कृती बांधकाम कामगार यांना ‘ भांडी योजना ‘ या योजनेचा जीआर हा 18 जानेवारी 2021 ला आलेला आहे. महाराष्ट्रातील ची नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत यांना 30 नगाचे भांडी किट योजना देण्यात येत आहे. या भांडी किट ची किंमत ही ‘ 15,000 ते 20,000 रुपये एवढी आहे. जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment