बियाणे अनुदान योजना 2024 शेतकऱ्यांना मिळत आहे शंभर 100 टक्के अनुदानावर बियाणे अर्ज कसा करायचा पहा

Biyane Anudan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे देत आहे. mahadbt biyane anudan yojana हे बियाणे कसे मिळवायचे याबद्दल आपणास माहिती होणार आहे. खरीप हंगामासाठी शासनामार्फत बियाणे वाटप हे जून मध्ये केले जाते आणि रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप हे सप्टेंबर ऑक्टोबर च्या दरम्यान केले जाते. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बियाणे वाटप होण्याआधी एक महिना सुरुवात होते.

बियाणे अनुदान योजना 2024

हे बियाणे गळीत आणि अन्नधान्य पिकासाठी असते. पण हे बियाणे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे दिले जाते. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सरकारी वेबसाईटवर Maha DBT या पोर्टलवर भरावे लागते. mahadbt biyane anudan yojana अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक ते दीड महिन्याच्या आत हे बियाणे कृषी विभागामार्फत दिले जाते.

Biyane Anudan Yojana 2024

Biyane Anudan Yojana 2024 : महाराष्ट्र शासनाने 2007-08 या वर्षापासून अन्नसुरक्षा अभियान रामाने सुरुवात केली. ते अंतर्गत बियाणे अनुदान योजना सुरू केली.

बियाणे अनुदान योजना पात्रता

  1. महाराष्ट्रातील शेतकरी असला पाहिजे
  2. त्याच्या नावाने 7/12 व 8 अ उतारा पाहिजे.
  3. गहू, तांदूळ, कापूस, डाळिंब तसेच ऊस या पिकासाठी जर अर्ज करत असाल तर अर्ज करताना त्या जिल्ह्यातील शेतकरी असला पाहिजे.
पिके जिल्हा
कापूस यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि अमरावती
बाजरी नगर, नाशिक, जळगाव, सातारा, पुणे, सांगली, बीड, संभाजीनगर, धाराशिव, जालना आणि धुळे
ज्वारी नगर, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, धाराशिव, नांदेड, कोल्हापूर, परभणी, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, बीड, आणि जालना
ऊस संभाजीनगर, बीड आणि जालना
Biyane Anudan Yojana 2024

यासोबत भरड धान्य, तृणधान्य, कडधान्य आणि भात यासाठी सुद्धा अनुदान मिळते.

बातमी पहा :

Mahadbt biyane anuydan yojana maharashtra
Mahadbt biyane anuydan yojana maharashtra

बियाणे अनुदान योजना mahadbt biyane anudan yojana Highlight

योजना बियाणे अनुदान योजना 2024
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
पात्रता महाराष्ट्रातील शेतकरी पाहिजे, त्याच्या नावावर सातबारा पाहिजे
लाभ विविध पिकांचे बियाणी मिळतील.
योजना सुरू2007-08 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत
पिके अन्नधान्य, कडधान्य, तृणधान्य आणि फळ बाग यासाठी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्जाची लिंक येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

बियाणे अनुदान योजना पात्रता अर्ज कोठे करणार

बियाणे अनुदान योजना 2024 मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटवर यायचं आहे.

  1. बियाणे अनुदान योजना मिळवण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर यायचे आहे.
  2. या पोर्टल वर आल्यानंतर सुरुवातीला तुमची प्रोफाईल बनवावी लागेल ( खाते बनवावे लागेल ).
  3. खाते बनवताना तुमचे नाव, पॅन कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड, आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक हे सर्व लागेल यासोबतच जमिनीचे उतारे सुद्धा लागतील.
  4. प्रोफाइल बनवल्यानंतर तुम्ही अर्ज करा ऑप्शन निवडा.
  5. अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ” बियाणे अनुदान योजना ” ऑप्शन दिसेल यावर क्लिक करायचं आहे.
  6. कोणत्या पिकासाठी पाहिजे, तसेच किती पिकासाठी पाहिजे हे एक एक भरायचे आहे.
  7. एक एक भरल्यानंतर तुम्ही त्याला प्रायोरिटी द्यायची आहे तसेच आवश्यक असणारे पेमेंट 23.60 रुपये त्यामध्ये भरायचे आहे/
  8. यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन कृषी विभाग कडे भरला जाईल.
  9. एकदा अर्ज भरल्यानंतर काही दिवसातच तुमचे विभागातील कृषी सहाय्यक जे अधिकारी असतील ते तुम्हाला संपर्क करतील किंवा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा.
  10. बियाणे अनुदान पॅकिंग पिशव्या तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये काही दिवसातच दिले जाईल.

Leave a Comment