या दिवशी येणार नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता Namo Shetkari Yojana 4th Installment Date

Namo shetkari Yojana 4th installment : नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचा चौथा हप्ता हा लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केला जाणार आहे. या संदर्भात ऑफिशियल अशी माहिती समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमार्फत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत मिळतात. हे पैसे प्रत्येकी तीन इंस्टॉलमेंट ( 3 installment ) मध्ये दिले जातात. आणि प्रत्येक इन्स्टॉलमेंट ( installment ) हा 2000 रुपयाचा असतो.

केंद्र सरकारने सुद्धा भारतातील पात्र शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत पैसे पाठवण्याची योजना काढलेली आहे. या योजनेचे नाव आहे ‘ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ‘. पीएम किसान योजना, ही योजना फेब्रुवारी 2019 पासून भारतामध्ये राबवली जाते. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर वार्षिक 6,000 रुपये येतात. हे सुद्धा प्रत्येकी तीन इंस्टॉलमेंट ( 3 installment ) मध्ये येतात. प्रत्येकी इन्स्टॉलमेंट ( Installment ) हा 2,000 रुपयाचा असतो.

बातमी पहा :

शेळी पालन व्यवसाय सुरू करा सरकार देत आहे लाखो अनुदान..

 तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल 

घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० %

 शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन 

Namo shetkari Yojana 4th installment : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक फायदा जास्त होतो. केंद्र सरकारचे पी एम किसान योजनेचे 6,000 रुपये येतात. आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुद्धा काढलेली आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात. म्हणजे एकूण वार्षिक 12,000 रुपये शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत बँक खात्यावर मिळतात.

पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार

नुकतेच केंद्र सरकार च्या पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारी 2024 येऊन गेलेला आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर आता बराच काळ झालेला आहे. त्यामुळे पीएम किसान चा 17 वा हप्ता कधी येणार यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये आतुरता झाली आहे. कारण पी एम किसान चा हप्ता प्रत्येक चार महिन्यातून एकदा येत असतो. तीन महिने झालेले आहेत. त्यामुळे पुढील 17 हप्त्याची तारीख किती आहे यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तर या सातव्या हप्ता संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे

Namo Shetkari Yojana 4th Installment Date
Namo Shetkari Yojana 4th Installment Date

नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता कधी मिळणार

नमो शेतकरी योजना म्हणजेच नमो शेतकरी महासामान्य योजना. ही योजना महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असणारे असणारी महत्त्वाची योजना आहे. एम किसान योजनेप्रमाणेच या नमो शेतकरी योजनेमार्फत वार्षिक सहा हजार रुपये येतात. त्यामुळे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्हींची मिळून पैसे कधी येणार याची वाट शेतकरी पाहत आहेत. या नमो शेतकरी योजना संदर्भात सुद्धा एक गुड न्यूज झाली आहे. हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पडणार आहेत.

पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना दोन्ही हप्ते सोबतच मिळणार

मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना हे दोन्ही योजना एकसारख्याच आहेत. यातली पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची योजना आहे, पण या दोन्ही योजनेचे पैसे हे एकाच दिवशी येतात. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी या योजनेचे पैसे कधी बँक खात्यावर येणार यासंदर्भात नेहमी माहिती घेत असतात. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी, सूत्रांच्या आलेल्या माहितीनुसार ( कृषी विभाग ) पीएम किसान चे पैसे हे जून महिन्याच्या 25 तारखेला येणार आहे. अर्थात नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे या 25 जूनला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार आहे.

सध्या निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणावर आहे आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे पाठवणे शक्य नसल्याने हे पैसे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकारमार्फत पाठविले जाणार आहे. त्यामुळे हे पैसे तुम्हाला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच बँक खात्यावर जमा होईल.

नमो शेतकरी योजना नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक ( आधार लिंकिंग )
  • सातबारा आणि आठ अ
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा.

FAQs नमो शेतकरी योजना

1. नमो शेतकरी योजना, ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे.

नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र शासनाने सन 2023 मध्ये सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील जे पात्र शेतकरी असतील त्यांना वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवण्याची ही योजना आहे. एकदा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर हे पैसे बँकेमध्ये ऑटोमॅटिक येत राहणार आहे. यासाठी वेळोवेळी ई केवायसी आणि आधारला बँक लिंक करणे गरजेचे आहे.

२. शेतकरी योजना या योजनेतून किती पैसे मिळतात ?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये बँक खात्यावर येतात.

3. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेची वेबसाईट कोणती आहे ?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेची वेबसाईट https://nsmny.mahait.org/ ही आहे. या वेबसाईटवर तुम्ही तुम्हाला किती पैसे आले आहेत या संदर्भात सर्व माहिती पाहायला मिळेल तसेच या वेबसाईटवर तुमचा नोंदणी क्रमांक, लिंक असलेला मोबाईल नंबर आणि किती हप्ते राहिलेत या संदर्भात सर्व माहिती मिळेल.

4. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना स्टेटस कसे पाहिजे ?

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना, या योजनेचे आलेले पैसे तसेच येणारे पैसे यासंदर्भात स्टेटस पाहण्यासाठी https://nsmny.mahait.org/ या वेबसाईटवर यायचे आहे. वेबसाईटवर आल्यानंतर मोबाईल नंबर द्वारे अथवा नोंदणी क्रमांक Registration number द्वारे तुमचे स्टेटस पाहू शकता.

बातमी पहा :

घरात लहान मुलगी असेल तर सरकार देत आहे १ लाख रुपये मुलीच्या बँक खात्यावर,योजना पहा

ई पिक पाहणी आता नवीन App वर, जुन्या App वर आत्ता माहिती रद्द होणार

फक्त गट नंबर टाका, मिळवा चतुरसीमा आणि नकाशा..

सरकारी योजना, नोंदणी करा आणि व्यावसायिक कर्ज मिळवा खूप कमी दराने ‘ पी एम विश्वकर्मा योजना ‘

Leave a Comment