नमस्कार मंडळी , केंद्र सरकार मार्फत दरवर्षी भारतातील नागरिकांना ज्यांना घर नाहीत त्यासाठी घरकुलांची यादी वेबसाईटवर टाकत असते. ज्यांना राहण्यासाठी घर नाही त्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर काही दिवसाचं त्यांचे घरकुल मंजूर होते. तर कोणाला घरकुल मंजूर होतात या संदर्भात आपण या पोस्टमध्ये माहिती पाहणार आहोत.
gharkul yadi ग्रामपंचायत घरकुल यादी
तुमच्या गावांमध्ये किती जणांनी घरकुल साठी अर्ज केले होते तसेच किती जणांचे अर्ज मंजूर झालेत या संदर्भात सर्व माहिती या केंद्र सरकारच्या वेबसाईट मध्ये असते. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण नावासकट माहिती मिळते, अर्ज करणाऱ्यांपैकी कोणाला आधी प्रायोरिटी मिळाली आहे याबद्दल देखील माहिती दिलेली असते. सुरुवातीला घरकुल कोणाचे मंजूर करायचे कोणाचे , अर्ज पुढे गेले या संदर्भात कोणती माहिती नव्हती ! ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने ती सर्व घरकुल मंजूर यादी आता वेबसाईटवरच माहिती देण्याचे ठरवले , त्यानुसार प्रत्येक गावातून पात्र लाभार्थ्यांची यादी त्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळते.
महाराष्ट्र घरकुल नवीन यादी 2024 Gharkul Yadi Kashi Pahayachi List
- महाराष्ट्र नवीन घरकुल यादी पाण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एका वेबसाईटवर यायचे आहे त्याची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट लिंक 👉👉 ( वेबसाईट लिंक ) 👈👈
- ही वेबसाईट तुम्ही तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल किंवा मोबाईल जरी असला तरी यामधून तुम्ही पाहू शकता.
👉👉 नवीन घरकुल यादी 2024 पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा👈👈
- वर दिलेली लिंक वर गेल्यानंतर तेथे तुम्हाला डाव्या साईटला सिलेक्शन फिल्टर ( Selection Filters ) म्हणून दिसत असेल. त्याच्याखाली ऑल स्टेट ( All State ) ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं. या ऑल स्टेट ला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्ही महाराष्ट्रातील असाल तर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे.
- त्याच्यानंतर खाली एक ऑप्शन तयार होईल त्यामध्ये तुम्ही तुमच्या जिल्हा ( District ) निवडायचा आहे.
- जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका ( Taluka ) निवडायचा आहे.
- तालुका निवडल्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन खाली ओपन होईल त्यामध्ये तुमची तुम्हाला गाव ( Village ) निवडायचे आहे. गाव निवडल्यानंतर खाली कॅपच्या निघेल तो कॅपच्या भरायचा आहे आणि खाली सबमिट ( Submit ) करायचा आहे.
- सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक लिस्ट ओपन होईल ती लिस्ट तुमच्या गावातील सर्व मंजूर घरकुलांची आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटेल जिल्हा, नोंदणी, नोंदणी क्रमांक, प्रायोरिटी नंबर सर्व डिटेल अशी माहिती पाहायला मिळेल.
- जर तुम्ही घरकुलासाठी जर फॉर्म भरला असेल आणि तुमचं जर नाव नसेल त्यामध्ये तर तुम्ही या संदर्भात तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा ग्रामसेवकाशी चर्चा करू शकता.
महाराष्ट्र घरकुल योजना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Gharkul Yadi Kashi Pahayachi Important Dcoument Gharkul Yojana
महाराष्ट्र घरकुल योजना किंवा केंद्र सरकारची प्रधानमंत्री घरकुल आवास योजना यामध्ये जर तुम्हाला तुमचे नाव समाविष्ट करायचे असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये हा अर्ज भरून द्यावा लागेल अर्ज भरल्यानंतर पात्रतेच्या याद्या येतात. याद्या आल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला पहिला हप्ता हा तुमच्या बँक खात्यावर पडणार आहे त्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. आता ग्रामपंचायत मध्ये अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- अर्जदाराचे बँक पासबुक
- अर्जदाराचे जॉब कार्ड
- अर्जदाराकडे घरकुल बांधण्यासाठी जागा असणे संदर्भात – गाव नमुना 8 किंवा सातबारा उतारा.
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर.
- उत्पन्ना चे शपथ पत्र
- पक्के घर नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र.
- शेवटी अर्ज लागेल.
घरकुल मंजूर यादी
घरकुलांच्या ते संदर्भात याद्या पाहू शकता. तुम्हाला घरकुल पात्र तुमच्या गावातील लोकांची यादी पाहायला मिळेल.
घरकुलाचा हप्ता किती तारखेला जमा झाला आहे हे कसे पाहायचे Gharkul Yadi Kashi Pahayachi Installment process And Total Subsidy gharkul yojana
मित्रांनो ! तुम्हाला जे घरकुल मंजूर झालेले आहेत, त्या घरकुलाचे जर पैसे पाहिजे असेल तर एकदम सोपी पद्धत आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला ही घरकुल यादीचे नाव कसे पाहिजे आपण या संदर्भात माहिती पाहिली आहे ( वेबसाईट लिंक 👉👉 ( वेबसाईट लिंक ) 👈👈 ) वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही पात्र घरकुलांच्या ते संदर्भात याद्या पाहू शकता. तुम्हाला घरकुल पात्र तुमच्या गावातील लोकांची यादी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही गावाचे नाव, जिल्हा, तालुका, नोंदणी क्रमांक ( Registration No ), तसेच प्रायोरिटी सुद्धा पाहायला मिळेल तर आपण या घरकुल योजनेचे किती पैसे आलेत किती येणार आहे या संदर्भात सर्व माहिती पाहू शकतो.
- सुरुवातीला वेबसाईटवर यायचे आहे. ( वेबसाईट लिंक 👉👉 ( वेबसाईट लिंक ) 👈👈 )
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही जिल्हा , तालुका, त्यानंतर गावाचे नाव टाकून लिस्ट पाहू शकता.
- लिस्टमध्ये तुम्हाला नोंदणी क्रमांक ( Registration No ) सुद्धा ऑप्शन दिसेल. नोंदणी क्रमांक वर गेल्यानंतर त्याच्या खाली बघा एक नंबर दिसतोय त्यावर थोडे टच करायचे, किंवा क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल. या ओपन झालेल्या पेज मध्ये घरकुल पात्र व्यक्तीची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच त्याला त्याच्या बँक खात्यावर किती पैसे जमा झालेत या संदर्भात सर्व इन्स्टॉलमेंट ( Installment ) पाहायला मिळतील.
- अशा पद्धतीने तुम्ही पात्र घरकुल लोकांच्या पैशासंदर्भात माहिती पाहू शकता.
घरकुल योजनेत अनुदान रक्कम किती मिळते Gharkul Yadi Kashi Pahayachi subsidy gharkul Yojana
मित्रांनो, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये अर्ज केल्यानंतर, गावातील ग्रामपंचायत मध्ये मंजूर घरकुलाच्या यादीमध्ये येते. याद्या आल्यानंतर तुम्हाला काम चालू करावे असे सांगितले जाते. या घरकुल बांधणीसाठी 1.20 लाख रुपये एवढे अनुदान दिले जाते. या अनुदान तुम्हाला एकदम तुमच्या बँक खात्यावर टाकत नाही, तर हे अनुदान तुम्हाला चार ते पाच हप्त्यांमध्ये तुमच्या बँक खात्यावर येत असते. तुमच्या घराचे काम जसे जसे पुढे जाईल त्या संदर्भात फोटो आणि पैसे मागणी अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हप्ते भेटत असतात. सादर प्रत्येक हप्ता हा 20 ते 25 हजाराचा असतो. असे मिळून तुम्हाला 1.20 लाख रुपये पर्यंत अनुदान घर बांधण्यासाठी मिळते.
FAQ महाराष्ट्र घरकुल नवीन यादी Gharkul Yadi Kashi Pahayachi
1. महाराष्ट्र घरकुल अनुदान योजना यामध्ये नाव कसे समाविष्ट करावे ?
महाराष्ट्र घरकुल अनुदान योजनेमध्ये किंवा महाराष्ट्र घरकुल नवीन यादी मध्ये जर तुम्हाला नाव द्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या भागातील जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन सविस्तर अर्जामध्ये ग्रामसेवकाकडे अर्ज करू शकता. त्यांना हवे असणाऱ्या सर्व गोष्टी आणि कागदपत्रे त्यांना पूर्तता करा. त्यानंतर तुमचे नाव महाराष्ट्र घरकुल अनुदान योजना, नवीन योजनेमध्ये पाहायला मिळेल.
2. महाराष्ट्र घरकुल अनुदान योजना यामध्ये सध्या 2024 मध्ये किती अनुदान भेटते ?
महाराष्ट्र घरकुल अनुदान योजना किंवा मोदी आवास घरकुल योजना यामध्ये घरबांधणीसाठी तुम्हाला 1.20 लाख रुपये ग्रामीण भागासाठी मिळत आहे. शहरी भागासाठीच हे अनुदान 1.40 लाख रुपये एवढे आहे. हे जे हप्ते असतात तुम्हाला 5 ते 6 हप्त्यांमध्ये मिळून जातात.
3. महाराष्ट्र घरकुल अनुदान योजना यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ?
महाराष्ट्र घरकुल अनुदान योजना किंवा मोदी आवास घरकुल योजना मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते यामध्ये तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, फोटो, जागेचा फोटो, जागेचा उतारा, जॉब कार्ड, कमी उत्पन्न असल्याबाबत दाखला, पक्के घर नसल्याबाबत हमीपत्र किंवा स्वयंघोषणापत्र आधी कागदपत्रे जमा करून तुम्ही हे महाराष्ट्र घरकुल अनुदान योजना मिळू शकतात.