Pm Kisan Yojana 17th installment : नमस्कार शेतकरी बंधूंनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, या योजनेचा 17 वा हप्ता हा कधी येणार या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये आतुरता झाली आहे, Pm Kisan Yojana 17th installment date तर शेतकरी बंधूंनो या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 17 वा हप्ता संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आलेली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाली होती. या पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. प्रत्येक हप्ता हा 4 महिन्याच्या अंतरामध्ये दिला जात आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजना, यामध्ये जर तुमची नोंदणी झाली नसेल तरी या संदर्भात एक चांगली बातमी आहे. ही नोंदणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता. तुम्ही जर या ऑनलाईन नोंदणीमध्ये पात्र ठरले तर तुम्हाला या पी एम किसान योजनेच्या यादीमध्ये दिसाल. त्यानंतर तुम्हाला वार्षिक 6 हजार रुपये या योजने अंतर्गत मिळायला सुरवात होईल. सोबतच तुम्ही जर महाराष्ट्रा चे रहिवासी असाल तर तुम्हाला डबल फायदा होईल. पी एम किसान योजनेचे 6 हजार रुपये आणि महाराष्ट्र शासनाची एक योजना शेतकऱ्यांसाठी ” नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना “ या योजनेअंतर्गत सुद्धा 6 हजार रुपये मिळू लागतील. म्हणजे तुम्हाला वार्षिक एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत.
📝 हि बातमी पहा : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापना – शेतमजूर तसेच जे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी 📝
पी एम किसान नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे Pm Kisan Yojana 17th installment Important Document
केंद्र पुरस्कृत शेतकऱ्यांसाठी असणारी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान सन्मान योजना, जर या योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे त्याची यादी पुढीलप्रमाणे.
- पीएम किसान योजनेचा नोंदणीचा फॉर्म ( ग्रामसेवक, तलाठी तसेच कृषी सहाय्यक यांच्यासह असणारा फॉर्म )
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- अर्जदाराचे बँक पासबुक
- अर्जदाराच्या नावाने 7/12 उतारा.
- अर्जदाराच्या नावाने असलेला महसुल विभागातील शेतजमीनशी निगडित असणारा 8 अ चा उतारा.
- अर्जदाराचे नावाने झालेली जमीन – फेरफार चा उतारा. – ( अटी-अर्जदाराच्या नावावर ही जमीन फेब्रुवारी 2019 च्या आधी झालेली असावी. कालांतराने यामध्ये सुधारणा होईल अर्थात बदल होईल. )
वरील सर्व कागदपत्रे घेऊन तसेच आवश्यक असणारा फॉर्म जोडून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता. बऱ्याचदा असे होते की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काही कारणास्तव रिजेक्ट होण्याची शक्यता असते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्ही वरील कागदपत्रे अर्जाला जोडून त्यासोबत त्या फॉर्मवर, ग्रामसेवक , तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या सह्या घेऊन तो कृषी विभागात – पीएम किसान योजनेच्या डेक्स वर जमा करावा. आणि ही जी जमीन तुमच्या नावावर झालेली आहे ती फेब्रुवारी 2019 च्या आधी झालेली असे सांगावे. . यानंतर तुमचा अर्ज 100 टक्के मंजूर होईल.
जर तुम्ही फक्त ऑनलाईनच अर्ज भरला आणि ऑफलाईन जर कृषी विभागाकडे जमा केला नाही तर कदाचित तो अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. कारण या पी एम किसान योजनेमध्ये केंद्र सरकारचे प्रमुख अट आहे ती आहे ” तुमच्या नावावर जमिनी फेब्रुवारी 2019 च्या आधी झालेली असावी “. ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन अर्ज करता त्यावेळी तेथे फेरफार अपलोड करण्याची सुविधा नाही तसेच बँक पासबुक अपलोड करण्याची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी नाही. त्यामुळे ऑफलाइन सुद्धा अर्ज तुम्ही कृषी विभागात जमा करा.
📝 हि बातमी पहा : महिलांना मिळणार आता वार्षिक 12000 रुपये, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 📝
पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला आला होता !
शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेचा 16th हप्ता (16th Installment Pm Kisan Yojana ) हा दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत आला होता. या 16 वा हप्त्याबरोबरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 2 रा व3 रा हप्ता सुद्धा आला होता. त्यामुळे 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 6 हजार रुपये आले होते.
आता 16 व्या हप्त्यानंतर ( after 16th Installment ) बँक खात्यावर 17 वा हप्ता कधी जमा होणार यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये आतुरता झाली आहे. कारण या 17 व्या पीएम किसान योजना हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा 4 था हप्ता देखील येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये 17 व्या हप्त्या ( 17th installment ) संदर्भात आतुरता झाली आहे. चला तर पाहू 17 वा हप्ता कधी येणार आहे.
पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी येणार आहे Pm Kisan Yojana 17th installment date Declared !
शेतकरी बंधूंनो पीएम किसान च्या 17 व्या हप्ता ( 17th Installment date ) संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली की 17th हप्ता हा १८ जून २०२४ रोजी दुपारी वितरित केला जाणार आहे. त्यासाठी काही गोष्टीची सक्ती केली आहे..
- पीएम किसान केवायसी करणे. ( बायोमेट्रिक )
- आधार कार्ड ला बँक संलग्न करणे ( adhar seeding ). आधार कार्ड ला बँक संलग्न करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी तुम्ही बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड बँकेचे संलग्न चा फॉर्म भरणे ( adhar seeding form or NPCI Mapping form ) हे करणे गरजेचे आहे.
- त्यानंतर लँड शेडिंग करणे सुद्धा गरजेचे आहे ( Land Seeding ).
वरील गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला येणारा सतरावा हप्ता मिळणार नाही. जर 17 वा हफ्ता मिळाला नाही तर, नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता ( Installment ) मिळणार नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 हजार रुपयाची नुकसान होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर वरील सर्व गोष्टी करा.
केंद्र सरकारने नुकतेच 17 व्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी दिली आहे. लवकरच हा 17 वा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केला जाणार आहे. न्युज पेपर मध्ये आलेल्या बातमीनुसार किंवा केंद्र सरकारचे सलग्न असणाऱ्या मंत्र्यांच्या आलेल्या माहितीनुसार तुम्हाला हा 17 वा हप्ता हा जूनच्या 15 तारखेच्या आसपास मिळणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच हा हप्ता दिला जाणार आहे.
📝 हि बातमी पहा : कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे Benefits of eating neem leaves 📝
📝 हि बातमी पहा : अशी करा सोयाबीन पीकाची लागवड 📝