E pik pahani online registration Maharashtra : शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पिकाची पेरणी केल्यानंतर तसेच त्यानंतर पिक विमा भरल्यानंतर ई- पीक पाहणी भरणे शासनाने बंधनकारक केले आहे. जर शेतकऱ्याने ई- पीक पाहणी ऑनलाइन भरली नाही, तर भविष्यात शासनामार्फत जाहीर होणाऱ्या ओला दुष्काळ, सुका दुष्काळ या अनुदानाचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळणार नाही. कारण ती जमीन जर ई- पीक पाहणी केली नसेल तर ती पडीक जमीन मानली जाते. त्यामुळे शासनामार्फत ई- पीक पाहणी करून घ्या असे वारंवार तुम्हाला सांगितले जाते.
📝 ही माहिती पहा : बांधकाम कामगार महामंडळ बंद होणार, त्याऐवजी नवीन एकाच सर्वाना महामंडळ होणार 📝
ई- पीक पाहणी यशस्वी नोंदणी झाली आहे की नाही पहा ? E pik pahani online registration Maharashtra Check ?
E pik pahani online registration Maharashtra : शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये आपण पिक विमा भरताना खरीप पिक विमा, त्यानंतर रब्बी पिक विमा, उन्हाळी पिक विमा अशा प्रकारे पिक विमा भरतो. खरीप पिक विमा भरताना आपण ज्या पिकाची लागवड केली आहे आणि किती क्षेत्रावर केली आहे हे सर्व माहिती आपण यामध्ये भरत असतो. हा पिक विमा हा कंपनीकडे भरलेला असतो. पण बऱ्याचदा असे होते की, खरीप हंगामामध्ये एक तर खूप जास्त पाऊस पडतो, किंवा पाऊसच पडत नाही त्यामुळे येणारे पीक हे जळून जाते. तर अशा टाईमला शासन दुष्काळी अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान जाहीर करते. आणि यावेळी हे अनुदान देताना शासन तुम्ही ई- पीक पाहणी केली काय आहे की नाही हे शासन पाहत असते.
📝 ही माहिती पहा : शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन 📝
ई- पीक पाहणी झालेली आहे की नाही कसे पाहावे ? How to check accurate Pik Pahani is Successful Or Not ?
शेतकरी बंधूंनो, तुमची ई- पीक पाहणी झालेली आहे की नाही अशा पद्धतीने पाहू शकता. यासाठी आपण स्टेप बाय स्टेप माहिती पाहू
1. सुरुवातीला ई- पीक पाहणी पाहण्यासाठी तुम्ही ( http://115.124.110.196:8080/epeek/ ) या वेबसाईटवर यायचं आहे.
2. या वेबसाईटवर आल्यानंतर ‘ महाराष्ट्र शासन महसूल विभाग तसेच पीक पाहणी ‘ असे नाव दिसेल.
3. या नावाच्या खाली तुम्हाला कोणत्या हंगामाचे पाहिजे ते निवडावे, त्यानंतर महसूल विभाग निवडावा, त्यानंतर जिल्हा, तसेच कोणत्या तालुक्यातील आणि गावातील ई- पीक पाहणी पाहिजे आहे, त्याची निवड या ठिकाणी करायची आहे.
4. निवड करताना सुरुवातीला हंगाम निवडावे, महसूल विभाग निवडावा, जिल्हा, त्यानंतर तालुका त्यानंतर गाव असे निवडावे आणि त्याखाली असणारा ऑप्शन ‘ ई- पीक पाहणी ‘ अहवाल हे पाहावे. ( उदाहरणार्थ हंगाम – रब्बी, महसुली विभाग -नाशिक, जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेर गाव – सिद्धेश्वर वाडी असे निवडावे )
5. असे ऑप्शन घेऊन शेवटी यादीवर क्लिक करावे. तर तुम्ही ई- पीक पाहणी केली असेल. तर तर तुमचे त्या ठिकाणी यादी ला नाव दिसेल. जर या ठिकाणी तुमचं नाव दिसले नाही तर तुमची ई- पीक पाहणी ही यशस्वी झाले नाही असे समजावे.
📝 ही माहिती पहा : तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल 📝