PF EMPLOYEE : कोट्यावधी पी एफ खातेदारांना मोठा दिलासा ! आता आनंदाची सीमाच नाही, डोकेदुखी पासून कायमची सुटका epfo latest news in marathi

epfo latest news in marathi : नमस्कार, मित्रांनो ज्यांचे ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निधी ) यामध्ये खाते आहे अर्थात जे नोकरीला आहेत आणि त्यांचा पीएफ कट होतो त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने ईपीएफओ कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे. आणि ही सुधारणा खातेदारांसाठी खूपच चांगली आहे. यामुळे ज्यांची ईपीएफओ मध्ये खाते आहे त्यांची डोकेदुखी कमी होणार आहे. सरकारने या कायद्यामध्ये कायमची सुधारणा केली आहे.

हि बातमी पहा : लेक लाडकी योजना ! या योजनेतून कुटुंबाला लाखो रुपये मिळतात आताच भरा अर्ज…..

ईपीएफओ प्रक्रिया डोकेदुखी !

epfo latest news in marathi : मित्रांनो, जे कंपनीमध्ये काम करतात तसेच सरकारी नोकरदार आहेत त्यांचे महिन्याला ईपीएफओ खात्यामध्ये EPFO काही रक्कम जमा होत असते. या रकमेचा फायदा ज्यावेळी गरज लागेल किंवा निवृत्तीनंतर आर्थिक मदत साठी होत असते. सरकारने नुकतेच खातेदारांना काम करताना सोयीस्कर व्हावे म्हणून यामध्ये बदल केला आहे.

एखाद्या खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना अर्थात प्रायव्हेट मध्ये काम करत असताना बहुतांश वेळी संस्था बदलावे लागतात किंवा कंपन्या बदलावं लागतात. अशावेळी खातेदारांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो. जे खाते नंबर आहेत ते दुसऱ्या कंपनी सोबत शेअर करावे लागतात. शासनांनी यावर तोडगा काढला असून ईपीएफ कायद्यात सुधारणा केली आहे.

तुम्ही पाहिले असेल जेव्हा आपण कंपनी मध्ये बदल करतो, जुन्या कंपनीचे रेकॉर्ड पीएफ संदर्भात आपल्याला नवीन कंपनीसोबत शेअर करावे लागतात. तसेच जुन्या पीएफ खात्यातली रक्कम ही नवीन पीएफ खात्यामध्ये करावी लागत होती. त्यासाठी वेगळा फॉर्म नंबर 31 भरावा लागत होता. आता सरकारने जुन्या पद्धती बंद करून आता कोणतीही माहिती शेअर न करता तसेच कोणताही फॉर्म नंबर 31 न भरता कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये जुना यु ए एन नंबर UAN Number देऊन ते खाते तसेच पुढे चालू ठेवू शकता. या पद्धतीमुळे पीएफ खातेदाराकडून होणाऱ्या चुका होणार नाहीत. कारण बऱ्याचदा अशा अदलाबदलीमुळे बऱ्याच चुका व्हायच्या, प्रक्रिया माहीत नसल्यामुळे चुकीची माहिती शेअर केली जायची. पण यातून मोठ्या प्रमाणावर खातेदारांची डोके दुःखी ठरायची. हे बाब लक्षात घेता शासनाने यामध्ये बदल केलेला आहे.

हि बातमी पहा :   शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन…

ईपीएफओ ने काय बदल केला आहे ?

ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निधी संघटना आता नवीन नियमानुसार संस्थेमध्ये होणाऱ्या प्रोसेस मध्ये बदल केलेला आहे. पीएफ खात्यात जुनी माहिती देण्याची गरज नाही तसेच पैसे ट्रान्सफर करण्याची गरज नाही. फक्त नवीन कंपनीमध्ये तसेच संस्थांमध्ये तुम्ही यु ए एन नंबर UAN Number द्यायचा आहे. या निर्णयामुळे ईपीएफओ कर्मचारी आणि ईपीएफ ओ खातेदार होणारा गोंधळ थांबलेला आहे. या निर्णयाचे स्वागत खातेदारांनी नक्कीच केलेले आहे.

ईपीएफओ EPPO, पीएफ PF खाते काय आहे ?

ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटना Employees’ Provident Fund Organisation एक सरकारी संघटना आहे. या संघटनेमध्ये जे लोक कंपनीमध्ये काम करतात, संस्थेमध्ये काम करतात किंवा सरकारी नोकरदार आहेत हे संस्था कंपनी किंवा सरकारमार्फत या Employees’ Provident Fund Organisation ईपीएफओ खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला काहीतरी रक्कम टाकत असतात. या टाकलेल्या रकमेवर ठराविक व्याजदर सरकार देत असते किंवा ही ईपीएफओ देत असते. या रकमेचा फायदा जेव्हा गरज लागेल किंवा निवृत्तीनंतर आर्थिक मदत म्हणून मिळावी या उद्देशाने ही रक्कम घेतली जाते.

या ईपीएफओ स्थापना ही 4 मार्च 1952 रोजी झालेली आहे. मुख्यालय दिल्ली ह्या ठिकाणी आहे.

Leave a Comment