Land Record map Maharashtra 2024 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, भारत हा देश कृषीप्रधान देश असल्याकारणाने बहुतांश रोजगार सुद्धा कृषीवरच अवलंबून आहे. तसेच कृषी संदर्भात व्यवस्थित माहिती मिळावी म्हणून सरकार नेहमी प्रयत्नशील आपल्याला पाहायला मिळत असते.
सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगल्या चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करत असते. यामध्ये तुम्ही पाहिलं असेल पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धत केली आहे, तसेच शेतकऱ्यांना चार महिन्यातून चार हजार मिळावे म्हणून यासाठी डीबीटी पोर्टल सुद्धा विकसित केलेले आहे. याचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होत असतो.
📝 हि माहिती पहा : शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन 📝
गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईलवर Land Record map Maharashtra 2024
Land Record map Maharashtra 2024 : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी संदर्भात त्यांचे किती क्षेत्र आहे, कोणत्या ठिकाणी आहे, त्याचा नकाशा कसा आहे हे सुद्धा माहिती सरकारने ऑनलाइन केलेली आहे. आज आपण शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा कसा पहायचा यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. ही माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहू.
विविध स्टेप्स मार्फत तुमच्या शेत जमिनीचा नकाशा या ठिकाणी पहा Land Record map Maharashtra Steps By Steps Information
1. पहिल्यांदा तुम्ही भू नकाशा वेबसाईटवर यायचे आहे लिंक पुढे आहे ( https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html ) . या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या डाव्या बाजूला काही माहिती दिसेल, यामध्ये होम, कॅटेगिरी, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि व्हिलेज .
📝 हि माहिती पहा : घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० % 📝
2. यामध्ये तुम्ही कॅटेगिरी निवडा, या ठिकाणी कॅटेगिरी ही रुरल किंवा अर्बन हा ऑप्शन दिसेल ( rural And urban ) याबद्दल तुम्ही रुरल हा ऑप्शन घेऊ शकता, तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल.
3. रुरल ( ग्रामीण ) ही कॅटेगिरी घेऊन, त्याच्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडा ( जिल्हा निवड करायचा आहे ). यामध्ये तुम्ही किंवा तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे तो जिल्हा निवडायचा आहे. ( वर दिल्या चित्राप्रमाणे माहिती भरा ).
4. जिल्ह्याची निवड केल्यानंतर, त्यानंतर तालुका निवडायचा आहे. यामध्ये तुमचा जो तालुका असणार आहे तो तालुका या ठिकाणी निवडा.
5. तालुका निवडल्यानंतर, त्याच्या खाली एक ऑप्शन तुम्हाला दिसेल व्हिलेज Village ( गाव निवडा ). हे ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमच्या गावाची निवड करायची आहे किंवा तुम्हाला हवे असणाऱ्या गावाची निवड या ठिकाणी करू शकता.
6. त्यानंतर, त्याच्या खाली Search Plot No. असा ऑप्शन तुम्हाला शो होईल. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा जो गट नंबर आहे तो यामध्ये डायरेक्ट टाकू शकता. त्याद्वारे तुम्ही तुमच्या गटाचा नकाशा पाहू शकता.
7. जर तुम्हाला Search Plot No हा ऑप्शन घेऊन काही एरर येत असेल, तर तुम्ही त्याच्याखाली असणाऱ्या सर्व गटाचे नंबर शो होणार ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही हवा असणारा गट घेऊन सर्च ऑप्शन टाकू शकता. लगेच तुम्हाला त्या गटाचा नकाशा, त्या गटाचे मालक, आणि त्या गटाची चतुर सीमा तुम्हाला पाहायला मिळेल.
8. अशा प्रकारे तुम्ही अवघ्या पाच मिनिटाच्या आत, तुमच्या शेत जमिनीच्या आकार किंवा मॅप या ठिकाणी ऑनलाइन पाहू शकता. तसेच तुमच्या गटाशेजारी कोणाची जमीन आहे, ती किती आहे या संदर्भात सर्व माहिती या ठिकाणी पाहू शकता.
📝 हि माहिती पहा : तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल 📝