शेळी पालन व्यवसाय सुरू करा सरकार देत आहे लाखो अनुदान | Sheli Palan Yojana Maharashtra | goat farming

Sheli Palan Yojana Maharashtra : नमस्कार, महाराष्ट्र आणि केंद्र शासन शेतकरी तसेच पशुपालक यांना नेहमीच नवीन नवीन योजना आणत असते. पशुपालन हा व्यवसाय शेती संदर्भात जोड व्यवसाय म्हणून धरला जातो. हा पशुपालन व्यवसाय करून तुम्ही वर्षाला लाखो अनुदान मिळू शकता. तसेच यातून लाखो रुपये वार्षिक मिळू शकता.

ग्रामीण भागामध्ये विशेषता ! लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन नेहमी प्रयत्नशील असते. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतीला पूरक अशा अनेक योजना काढलेल्या आहेत, दुग्ध व्यवसाय संदर्भात, गाय गोठा अनुदान संदर्भात, शेळ्यांसाठी निवारा या संदर्भात ! या योजनेचा फायदा घेऊन ग्रामीण भागातील अनेक तरुण यामधून लाखो रुपये शासनाकडून अनुदान घेत आहेत.

शेळी पालन व्यवसाय सुरू करा Sheli Palan Yojana Maharashtra

ग्रामीण भागातील तरुणांना अर्थात लोकांना ग्रामीण भागातच एक उपलब्ध व्हावा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा आणि वर्षाला या तरुणांनी किंवा तरुणीने यामधून लाखो रुपयाचे उत्पन्न काढावे या उद्देशाने शासनाने ‘ शेळीपालन व्यवसाय योजना ‘ सुरू केलेली आहे. या व्यवसाय संदर्भात शासनामार्फत अर्ज मागविण्यात येत आहे. शेळी आणि मेंढी पालन व्यवसायासाठी अगदी कमी दरामध्ये तुम्हाला व्यावसायिक कर्ज उपलब्ध होते. हे कर्ज 10 लाख ते 50 लाखापर्यंत सुद्धा आहे.

Sheli Palan Yojana Maharashtra : शेळीपालन व्यवसाय या योजनेचे नाव आहे : ” 10 शेळ्या / मेंढ्या व एक बोकड वाटप करणे ”. या योजनेमध्ये संगमनेरी आणि उस्मानाबादी शेळ्या व बोकड वाटप करण्यात येईल. ही योजना खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील तरुणांना, शेतकऱ्यांना, आणि त्याला स्वयंरोजगार उपलब्ध पाहिजे असेल या सर्वाना या योजनेत सहभागी होता येईल.

हि बातमी पहा :   शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, 55 रुपये भरून मिळवा 3000 रुपये महिन्याला पेन्शन…

goat farming शेळी पालन व्यवसाय

योजनेचे नाव शेळी मेंढी पालन योजना
लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी
लाभ 10 लाख ते 50 लाख रुपये दरम्यान
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन /ऑफलाइन
योजनेचा उद्देश स्वयं रोजगार तयार करणे. शेतीला पूरक व्यवसाय तयार करणे.
लिंक[ https://ah.mahabms.com/ ]

goat farming योजनेचे उद्दिष्टे

 • गाव खेड्यामध्ये स्वयं रोजगार निर्माण करून रोजगार उपलब्ध करणे.
 • पशुपालन करणाऱ्या लोकांमध्ये जीवनमान उंचावणे. त्यांना आर्थिक पाठबळ देऊन सशक्त करणे.
 • पशुपालन करणाऱ्या महाराष्ट्र रहिवासी असणार लोकांना सहज आणि तत्पर्तने कर्ज उपलब्ध करून व्यवसायाला प्रोत्साहित करणे.
 • महाराष्ट्र राज्यांमध्ये दूध आणि त्यासोबत मांस उत्पादनाला प्रोत्साहन देणे.
 • महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करणे. त्यासोबत शेळी, , मेंढी आणि बोकड उत्पादनाला वाव देणे.

Sheli Palan Yojana Maharashtra
Sheli Palan Yojana Maharashtra

शेळी पालन व्यवसाय वैशिष्ट्ये Characteristics

 • पशुपालन विभागामार्फत शेळी मेंढी आणि बोकड मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे
 • यासाठी तुम्हाला पशुपालन विभाग या वेबसाईटवर यायचे लिंक { https://ah.mahabms.com/ }
 • शेळी मेंढी मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही हा अर्ज करू शकता. तसेच अर्जाची स्थिती सुद्धा पाहू शकता.
 • अर्ज करताना तुमचे नाव, कुटुंबाची माहिती, रेशन कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार नंबर, फोटो इत्यादी महत्त्वाची माहिती त्यामध्ये टाकावी लागते. हे तुम्ही घरबसल्या सुद्धा मोबाईल मधून टाकू शकता.
 • सर्वांना या योजनेमध्ये अर्ज करता यावा या उद्देशाने सरकारने ही वेबसाईट बनवली आहे हीच या वेबसाईट संदर्भात वैशिष्ट्ये आहे.
500 मादी व 25 नर 50 लाख रुपये
200 मादी व 10 नर
20 लाख रुपये
100 मादी व 5 नर
10 लाख रुपये

📝 हि माहिती पहा : तुमच्या गावातील घरकुल मंजूर यादी या ठिकाणी पहा, ग्रामसेवक कोणाची घरकुल यादी मंजूर करत आहे टी माहिती सुद्धा पाहायला मिळेल 📝

शेळी पालन व्यवसाय आवश्यक कागदपत्रे Document

 • आधार कार्ड स्वतःचे व कुटुंबाचे
 • रेशन कार्ड
 • बँक पासबुक
 • पासपोर्ट साईज फोटो
 • स्वतःची सही करावी लागेल.
 • ईमेल आयडी
 • फोन नंबर.
 • जमिनीचा 7/12 आठ व आठ अ उतारा
 • अपत्य प्रमाणपत्र.
 • रहिवासी स्वयं घोषणापत्र.
 • अनुसूचित जाती किंवा जमाती मधील अर्जदार असल्यास जातीचा दाखला जोडणे.

शेळी पालन व्यवसाय निवड प्रक्रिया Selection Method

 • शेळीपालन हा व्यवसाय व्यवसाय करायचा असेल, तर सुरुवातीला ऑनलाइन अर्ज भरावा लागतो.
 • ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर काही दिवसाच्या योग्य अर्जांची लाभार्थी यादी तयार होते.
 • या लाभार्थी यादी मधील अर्जदारांना या संदर्भात मेसेज जातो.
 • यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बोलवले जाते.
 • आणि या संदर्भात खर्च आणि कर्ज माहिती दिली जाते.
 • त्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता.

शेळी पालन व्यवसाय या योजने साठी आवश्यक पात्रता, अटी व शर्ती Eligibility, Terms And Conditions.

 • महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • या योजनेमध्ये महाराष्ट्राचा रहिवासी असेल तरच अर्जाचा विचार केला जाईल. जर महाराष्ट्र बाहेरील अर्ज आले तर ते अपात्र केले जातील याची नोंद घ्यावी.
 • अर्ज करणारे व्यक्तीने या योजने संदर्भात माहिती घेणे आवश्यक आहे.
 • जी व्यक्ती पशुपालन करण्यास उत्सुक आहे. अशा अर्जदारांना याचा फायदा दिला जाईल.
 • पशुपालन व्यवसाय या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पाहिजे. जास्तीत जास्त किती ही असले तरी काही हरकत नाही.
 • पशुपालन व्यवसाय ज्यांना कर्ज तसेच अनुदान घ्यायचे असेल त्यांच्याकडे चाराची व्यवस्था असणे गरजेचे आहे. शासन चारासंदर्भात कोणतीही मदत करणार नाही.
 • अर्जदाराकडे पशुपालन या व्यवसाय संदर्भात अनुभव असणे गरजेचे आहे.
 • अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे. या बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे.
 • अर्ज करताना कुटुंबातील फक्त एकच अर्जाचा विचार केला जाईल. एक अर्ज स्वीकारल्यानंतर दुसऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • अर्ज भरताना रेशन कार्ड वरील सर्व व्यक्तींचे आधार नंबर टाकणे गरजेचे आहे.

FAQ शेळी पालन व्यवसाय योजना PDf

1. शेळी पालन योजना या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

शेळीपालन योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पशुपालन विभाग या वेबसाईटवर यायचं आहे. इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. पण पंचायत समिती मार्फत सुद्धा शेळीपालन योजनेसाठी अर्ज करता येतो. या अर्जाची लिंक किंवा पीडीएफ वर दिलेली आहे. हा अर्ज मिळवून व्यवस्थित भरून तो पंचायत समितीमध्ये जमा करावा.

2. goat farming शेळीपालन योजनेसाठी किती अनुदान शासनाकडून दिले जाते ?

शेळीपालन योजना यासाठी शासनाकडून 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. तर अर्ज करणारा व्यक्ती हा अनुसूचित जाती जमातीमधील असेल तर त्या अर्जदारास 75 टक्के एवढे अनुदान दिले जाते.

3. शेळीपालन योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे ?

शेळीपालन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, सातबारा आठ अ उतारा, अपत्य प्रमाणपत्र, रहिवासी स्वयं घोषणापत्र या सर्व कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे.

📝 हि माहिती पहा : घरात पिठाची गिरण आहे का ? नसेल तर असा करा अर्ज लगेच मिळेल १०० % 📝

Leave a Comment